सोलापूर : जिल्ह्यातील (Solapur) कवठे गावात एका झाडाला प्रेमी युगलाने गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली होती. दोघांचेही मृतदेह खाली उतरवण्यात आले असून त्यांना छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनंतर गावात खळबळ उडाली आहे. आत्महत्या की घातपात यावरुन चर्चेला उधाण आलं आहे.
मृत युवती अकरावीच्या वर्गात शिकत होती. तर मृत तरुणाचे नाव सुरज कुंडलिक चव्हाण असून तो मोहळ तालुक्यातील रहिवाशी होता. उत्तर सोलापूरमधील कवठे शिवारातील एका लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या आवस्थेत हे जोडपे आढळले. ही घटना तेथील नागरिकांना कळताच त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली.
West Bengal : केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांवर हल्ला, भाजप आणि तृणमूल कार्यकर्त्यांमध्ये तणाव
पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावर कॉलेजची एक बॅग, एक दुचाकी पोलिसांना आढळून आली. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वी मृत घोषित केले.
प्राथमिक माहितीनुसार यातील मृत मुलगी ही मोहोळ तालुक्यात असलेल्या आपल्या मामाच्या गावी मागच्या वर्षी सुट्टीत गेली होती. त्यावेळी सूरज सोबत तिचे प्रेमाचे सूत जुळले. घरच्यांचा या प्रेम संबंधाला विरोध असल्याचे देखील समोर आले आहे. कुटुंबिंच्या विरोधानंतरही ते दोघेही कोणाचही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आज मात्र या दोघांनीही टोकाचे पाऊल उचलले. पुढील तपास पोलीस करत आहेत.