Dog Show : अहमदनगरमध्ये रंगला डॉग शो

अहमदनगर : युनायटेड केनल क्लब अंतर्गत अहमदनगर केनल क्लबतर्फे सावेडीतील गंगा उद्यानाच्या मागील मैदानावर डॉग शो चे रविवारी (ता. २२) आयोजन करण्यात आले होते. डॉग शो मध्ये ४१० श्वानांचे युकेसी चे रजिस्ट्रेशन करण्यात आले. या डॉग शोचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी गौतम मुनोत, माजी […]

Untitled Design (23)

Untitled Design (23)

अहमदनगर : युनायटेड केनल क्लब अंतर्गत अहमदनगर केनल क्लबतर्फे सावेडीतील गंगा उद्यानाच्या मागील मैदानावर डॉग शो चे रविवारी (ता. २२) आयोजन करण्यात आले होते. डॉग शो मध्ये ४१० श्वानांचे युकेसी चे रजिस्ट्रेशन करण्यात आले.

या डॉग शोचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी गौतम मुनोत, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, अहमदनगर केनल क्लबचे अध्यक्ष रमेश शिंदे, सचिव सचिन क्षीरसागर, परीक्षक राकेश वर्मा, अमरसिंग राजपूत, अरुण चौधरी, शशिकांत नजान उपस्थित होते.

डॉग शो ला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. पुणे, नाशिक, औरंगाबाद, बारामती, कोल्हापूर, सातारा, सांगली तसेच महाराष्ट्रातील विविध भागातून वेगवेगळ्या प्रजातीच्या श्वानांनी भाग घेतला तसेच श्वानप्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

१० फूट भव्य ट्रॉफी ही या डॉग शो चे मुख्य आकर्षण ठरले. या शो चे आय लव्ह नगर मुख्य प्रायोजक असून टच फाउंडेशन सह प्रायोजक होते. नगरी व्हिलेज, धनंजय जाधव, विपुल शेटिया, विकी इंगळे यांच्यासह अनेक प्रयोजकांनी डॉग शो साठी पाठबळ दिले. डॉग शो चे परीक्षण अमरसिंग राजपूत ( आग्रा ), राकेश वर्मा ( हरियाणा ) यांनी केले.

Exit mobile version