शिवसेना-भाजप संघर्ष पेटला; सांगोल्यात शहाजीबापूंच्या ऑफिसवर छापेमारी…

सोलापुरात शिवसेना-भाजप संघर्ष टोकाला पोहोचला असून माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या ऑफिसवर निवडणूक आयोगाच्या पथकाने छापेमारी केलीयं.

Untitle

Untitle

Shahajibapu patil : राज्यात सध्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या जाहीर सभा, आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच आता सोलापुरात शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष टोकाला पोहोचल्याचं दिसून येत आहे. सोलापुरात कालची सभा पार पडल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu patil ) यांच्या ऑफिसवर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने छापेमारी केल्याचं समोर आलंय. यावेळी भरारी पथकाने झाडाझडती घेतली मात्र, त्यांच्या हाती काहीही लागले नसल्याची माहिती समोर येत आहे. या छापेमारीवरुन शिवसेना कार्यकर्ते संतप्त झाल्याचे दिसून आले आहेत.

आजच्या उपभोगाचा भार उद्याच्या करदात्यांवर हे गंभीर, माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव काय म्हणाले?

सोलापुरात काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा पार पडली. सोलापुरात नगरपरिषद निवडणुकीसाठी शिवेसना आणि भाजपमध्ये जोरदार संघर्ष तापल्याचं चित्र आहे. अशातच वातावरणात काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या उमेदवारांसाठी तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सेनेच्या उमेदवारांसाठी सभा पार पडली. या सभेतून शहाजीबापूंसह इतर नेत्यांनी कडाडून टीका केल्याचं दिसून आलं. त्यानंतर काल प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. या सभेत फडणवीस यांनी कोणतीही टीका केली नाही, मात्र, सभेनंतर अचानक निवडणूक आयोगाचे भरारी पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शहाजीबापूंंच्या कार्यालयावर धाड मारलीयं.

उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, ‘या’ दोन ठिकाणी निवडणुका रद्द, 20 डिसेंबरला होणार मतदान

शहाजी बापूंची कालची विराट सभा संपल्यानंतर लगेचच भरारी पथकाने छापेमारी केलीयं. यासोबतच शहाजीबापूंच्या निकटवर्तींच्या ठिकाणांवरही छापे टाकल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता सोलापुरात सेना भाजपमधला संघर्ष सांगोल्यात टोकाला पोहोचला आहे, असं दिसून येतयं. काल रात्री 10 वाजता सभा संपल्यानंतर निवडणूक आयोगाचे भरारी पथक आले होते. यावेळी सभा संपल्यानंतर शहाजीबापू आपल्या ऑफिसात गेले. त्यावेळी पथकाने त्यांना आत जाऊ दिलं नाही. तसेच इतर दोन तीन लोकांच्या घरी छापेमारी करण्यात आलीयं.

दरम्यान, या कारवाईवर बोलताना शहाजीबापू म्हणाले, कालच्या सभेनंतर शिवसेनेच्या उमेदवारांना पोलिस ठाण्यात थांबवून ठेवलं होतं. भाजपकडून हे मुद्दाम घडवलं जात आहे. तर या भर सभेत एकनाथ शिंदे म्हणाले, बापूंना कोणी काही केलं तर मी त्यांच्या मागे उभा असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं होतं.

Exit mobile version