Download App

बोअरवेलमध्ये पडलेल्या ‘त्या’ चिमूरड्याचे प्राण वाचवण्यात अपयश

अहमदनगर : जिल्ह्यातील कर्जत येथून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे बोअरवेलमध्ये पडलेल्या एका पाच वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. सागर बुधा बरेला (रा चिडीया पुरा ता बऱ्हाणपूर मध्यप्रदेश) असे या मुलाचे नाव असून तो एका ऊसतोडणी कामगाराचा मुलगा होता. सागरला बोअरवेलमधून बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न केले. त्याला बाहेरही काढण्यात आले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जाऊ लागली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, कर्जत तालुक्यातील कोपर्डी परिसरामध्ये सध्या ऊस तोडणीसाठी ऊसतोड मजूर आले आहे. यातच शेतातील ऊस तोडून तो कारखान्यांना पाठवण्यासाठी ऊस तोडणी कामगारांकडून काम सुरु होते. या ऊसतोड कामगारांसोबत त्यांचे कुटुंबीय महिला व लहान मुले देखील आलेली होती.

गावातील शेतकरी काकासाहेब ज्ञानदेव सुद्रिक यांच्या शेतामधील ऊस तोडून कारखान्यांना पाठविण्याचे काम सुरू होते. हे काम सुरु असताना जवळच उघडा असलेला बोअरवेलमध्ये सागर हा पाच वर्षाचा मुलगा खेळत असताना पडला. यानंतर त्याला वरती काढण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर हालचाली करण्यात आल्या.

शिंदे सरकारचे भवितव्य ठरणार? सत्तासंघर्षावर आज सुनावणी

तातडीने प्रशासनाने दोन बाजूने जेसीबीने खोदकाम सुरु केले, सागरसाठी आतमध्ये ऑक्सिजनची व्यवस्था केली. आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे या दोघांनीही याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांना सर्व प्रयत्न करून छोट्या सागरचे प्राण वाचवण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या.

पेन्शनचे टेन्शन…राज्य सरकारचे 18 लाख कर्मचारी आजपासून संपावर

घटनेची गंभीरता पाहता एनडीएफआरचे पाच पथक घटनासाठली दाखल झाली होती. सुमारे 15 फूट खोलीच्या अंतरावर सागर हा अडकला होता. त्याला यातून बाहेर काढण्यासाठी आठ तास खोदकाम करून मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास त्याला बाहेर काढण्यात यश आले. मात्र दुर्दैवाने तोपर्यंत या चिमुरड्याची प्राणज्योत मालवली होती. चिमुरड्या सागरच्या मृत्यूने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जाऊ लागली आहे.

Tags

follow us