Crime : भीमा नदीतल्या ‘त्या’ सात जणांच्या खुनाचा कसा रचला कट?

अहमदनगर : पुणे (Pune)जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदी (Bhimba River) पात्रात काही दिवसांपूर्वी सापडलेल्या सात मृतदेहांच्या मृत्यूचं गुपीत उलगडण्यात पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (LCB) यश आलंय. जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) तपासात या सात जणांची हत्याच झाल्याचं समोर आलंय. या सातही जणांची हत्या चुलत भावांनीच केल्याचं पोलिसांच्या तपासात […]

Untitled Design (8)

Untitled Design (8)

अहमदनगर : पुणे (Pune)जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदी (Bhimba River) पात्रात काही दिवसांपूर्वी सापडलेल्या सात मृतदेहांच्या मृत्यूचं गुपीत उलगडण्यात पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (LCB) यश आलंय. जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) तपासात या सात जणांची हत्याच झाल्याचं समोर आलंय. या सातही जणांची हत्या चुलत भावांनीच केल्याचं पोलिसांच्या तपासात उघडकीस आलंय.
YouTube video player
पोलिसांच्या माहितीवरुन, पवार यांच्या कौटुंबिक वादातूनच हत्या झाली आहे. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली. त्यात अशोक कल्याण पवार, 2) श्याम कल्याण पवार, 3) शंकर कल्याण पवार, 4) प्रकाश कल्याण पवार (सर्व रा. ढवळेमळा, निघोज, ता. पारनेर, जि. अहमदनगर) यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. पुढे मोहन पवार यांचा मृतदेह कुटुंबासह भीमा नदीत सापडला. त्यांचाच मुलगा अमोल पवार त्याचा चुलतभाऊ धनंजय पवारसोबत तीन महिन्यांपूर्वी, पेरणे फाट्यावर गेला होता. परत माघारी येताना त्यांचा अपघात झाला. त्यामध्ये धनंजय पवारचा मृत्यू झाला. पण धनंजयच्या कुटुंबियांना संशय आला की, या सर्व कुटुंबांनं त्याच्यावर जादूटोणा (करणी) केली अन् त्याच्यातूनच हत्या झाली.

पुढे काही दिवसांतच धनंजयच्या कुटुंबानं मोठा कट रचून अमोल पवारच्या संपूर्ण कुटुंबाचाच काटा काढायचं ठरवलं. मोहन यांच्या कुटुंबाला यवतला परत आणलं. त्यानंतर मध्यरात्री साडेबारा- एकच्या दरम्यान त्यांचा गळा दाबून मारलं. त्यानंतर भीमा नदीत फेकून दिलं. इतकंच नाही तर त्यात तीन मुलांचा देखील समोवेश आहे. झोपलेल्या अवस्थेतच सातही जणांचा खून केला.

सुरुवातीला 18 जानेवारीला नदीत एका महिलेचा मृतदेह सापडला. दुसऱ्या दिवशी 19 जानेवारीला आणखी एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. दोन दिवसांनी 20 जानेवारीला एका महिलेचा मृतदेह आढळला.

पोलिसांना या प्रकरणाचा तपास करत असतानाच, 21 जानेवारीला पुन्हा एका व्यक्तीचा मृतदेह सापडला. या प्रकरणात 18 ते 21 जानेवारी दरम्यान एकूण चार मृतदेह सापडले. त्यानंतर पोलिसांनी नदीपात्रात शोधमोहीम सुरू केली. त्यानंतर काही दिवसात आणखी तीन मृतदेह पोलिसांना सापडले. ते तीनही मृतदेह लहान मुलांचे होते.

Exit mobile version