Download App

Pandharpur : भीषण अपघातात आजीसह नातवाचा जागीच मृत्यू

सोलापूर : पंढरपूर (Pandharpur) आटपाडी रोडवरील शेरेवाडीजवळ एक भीषण अपघात (Accident)घडलाय. रस्त्याच्या कडेला ट्रॅव्हल्सची वाट पाहात उभ्या असणाऱ्या कुटुंबाला भरधाव कारनं(Car Accident) चिरडलंय. त्यामध्ये आजीसह नातवाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झालेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गाडी चालकाला पोलिसांनी (Police) ताब्यात घेतलंय.

सविस्तर माहिती अशी की, सांगोला तालुक्यातील शेरेवाडी येथे ही दुर्दैवी घटना घडलीय. रविवारी (दि.26) सायंकाळी चार ते पाचच्या सुमारास भरधाव वेगानं जाणाऱ्या कारनं रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या कुटुंबाला उडवलं आणि त्यानंतर कार थेट दुकानात घुसली. त्यामुळं दुकानाची भिंत पडली आणि कार दुकानात जाऊन थांबली.

शिंदे महाराष्ट्राचे की गुजरातचे मुख्यमंत्री? आदित्य ठाकरेंनी भर सभेत ललकारलं

यावेळी द्रौपदा शिवाजी आटपाडकर यांचा गाडीखाली जागीच मृत्यू झाला. तर नातू दुकानातील भिंतीखाली सापडला. सिद्धेश्वर काळेल असं मृत्युमुखी पडलेल्या पाच वर्षीय नातवाचं नाव आहे. या धडकेत मृत मुलाचे वडील नामदेव काळेल आणि त्याची आई रुक्मिणी काळेल देखील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सांगोला येथील उपचार सुरु आहेत.

काळेल कुटूंब रोजगारासाठी मुंबईला जाणार होतं. आणि रस्त्याच्या कडेला ट्रॅव्हलसची वाट पाहत उभा असताना भरधाव कारनं धडक दिली. ही कार एका राजकीय नेत्याशी संबंधित असल्याची माहिती आहे.

Tags

follow us