Download App

Petrol Pump : पंपावर काय ही फसवणूक, पेट्रोल मिळण्याआधीच मीटर पडले…

ग्रामीण भागातील पेट्रोल पंपावर अनेकदा शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या घटना होत असतात. यावर फार कारवाई देखील होताना दिसत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामध्ये एका पेट्रोल पंपावर शेतकऱ्याची फसवणूक होताना शेतकऱ्याने पेट्रोल पंपवाल्याला रंगेहात पकडले आहे. यानंतर संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

(Oscars 2023 मध्ये नाटू-नाटू गाण्यावर करणार परफॉर्म, राम चरण म्हणाला…)

ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याच्या एका गावात घडली आहे. गावातील एक शेतकरी पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल भरण्यासाठी गेला होता. यावेळी त्याला दुचाकीत पेट्रोल टाकण्या आधीच पेट्रोल पंपावरील मीटरने पेट्रोल पडल्याचे दाखविले. याघटनेनंतर शेतकरी अत्यंत संतप्त झाला असून त्याने तेथील उपस्थित पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत.

यावेळी सदर शेतकरी हा अत्यंत रागावेलला दिसला. ही घटना घडली त्यावेळेला पेट्रोल पंपावर इतरही अनेक लोक उपस्थित होते. त्या सर्व लोकांच्या समवेत या शेतकऱ्याने पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या झापले आहे. या घटनेचा सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

 

 

 

Tags

follow us