PM Modi Criticize Congress and India Allince on PM Formula : लोकसभा निवडणुकीची ( Lok Sabha Elction ) रणधुमाळी सुरु असून पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi) आज महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यात प्रचारसभा घेत आहेत. त्यात सोलापूर लोकसभेचे महायुती आणि भाजपचे उमेदवार राम सातपुते ( Ram Satpute) यांच्यासाठी मोदी यांनी मतदारांना आवाहन करताना त्यांनी इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदाच्या फॉर्म्युल्यावरून कॉंग्रेस, इंडिया आघाडीसह ठाकरे-राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला.
नाशिकमध्ये मोठा ट्विस्ट, शांतीगिरी महाराजांनी केला शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल
यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, काँग्रेस देशाची सत्ता मिळवण्याची स्वप्न पाहत आहे. पण त्यांना माहित नाही की, निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यातच काँग्रेस सह इंडिया आघाडीचा पत्तागुल झाला आहे. तसेच इंडिया आघाडीमध्ये नेतृत्वावरून संघर्ष सुरू आहे. त्यामुळे अशा लोकांच्या हातात तुम्ही देशाची सत्ता देणार का? असं सवाल मोदी यांनी यावेळी जनतेला विचारला.
तुमच्या कौटुंबिक वादामुळे महाराष्ट्र का उध्वस्त करता? पंतप्रधान मोदींचा ठाकरे-पवारांवर घणाघात
तसेच इंडिया आघाडीच्या संघर्षातून एक नवा फॉर्मुला समोर आला आहे. तो म्हणजे पाच वर्ष पाच पंतप्रधान असणार आहेत. प्रत्येक वर्षी येणारा पंतप्रधान देशाला भेटणार आहे. तसेच नकली शिवसेना देखील म्हणत आहे की, आमच्याकडे पंतप्रधान पदासाठी अनेक लोक आहेत. त्यांच्याच एका नेत्याने म्हटलं की, आम्ही चार वर्षात चार पंतप्रधान केले तरी काय होईल? असं म्हणत मोदी यांनी उद्धव ठाकरेंसह संजय राऊत यांनी टीका केली.
उद्धव ठाकरेंची टीका म्हणजे सूर्याकडे थोबाड करून थुंकण्याचा प्रकार; फडणवीसांचे टीकास्त्र
मात्र एवढा मोठा देश अशा प्रकारच्या फॉर्मुल्यांनी चालणार आहे का? पण इंडिया आघाडीला सत्ता मिळवण्याचा हा एकच मार्ग बाकी राहिला आहे. कारण त्यांना देश चालवायचा नाही त्यांना जनतेच्या भविष्याची चिंता नाही तर सत्तेची मलई मिळवायची आहे. असं म्हणत मोदींनी कॉंग्रेस, इंडिया आघाडीसह ठाकरे-राऊतांवर टीका केली.