पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शिर्डी दौरा; काळे झेंडे दाखवून शेतकरी आंदोलन करणार

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 ऑक्टोबर रोजी नगर जिल्ह्यांमध्ये येणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डीमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यानिमित्ताने प्रशासनाकडून मोठी तयारी देखील सुरू झाली आह. दरम्यान मोदींच्या या दौऱ्याला काळ्या फिती लावून काळे झेंडे दाखवण्यात येणार आहेत. नालेगाव व नेप्ती, निंबळक शिवारामध्ये नॅशनल हायवे गेलेला असून हायवे […]

narendra modi

narendra modi

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 ऑक्टोबर रोजी नगर जिल्ह्यांमध्ये येणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डीमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यानिमित्ताने प्रशासनाकडून मोठी तयारी देखील सुरू झाली आह. दरम्यान मोदींच्या या दौऱ्याला काळ्या फिती लावून काळे झेंडे दाखवण्यात येणार आहेत.

नालेगाव व नेप्ती, निंबळक शिवारामध्ये नॅशनल हायवे गेलेला असून हायवे जमिनीपासून दहा ते पंधरा फूट उंच केलेला आहे. त्यामुळे तिन्ही गावातील शेतकऱ्यांना शेतीमध्ये शेती करण्यासाठी रस्ता नाही. रस्ता नसल्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतामध्ये जाण्यासाठी फार मोठी अडचण झाली आहे. शेतकरी संघटनांनी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिलेले आहे.

शेतकऱ्यांनी अहमदनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आमरण उपोषण केलेले असून संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन देऊन चर्चा केली आहे. परंतु अधिकारी शेतकऱ्यांची अडचण समजून घेण्यास तयार नाही. सरकार शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कमी पडत असून लोकशाही मार्गाने वेळोवेळी मागणी करूनही अधिकारी शेतकऱ्यांना पर्यायी रस्ता देण्यास तयार नाही.

महादेवाच्या पिंडीवर धारदार वस्तूने ओरखडे ओढले; नगर शहरातील घटना, पोलिसांत गुन्हा दाखल

याच्या निषेधार्थ 26 ऑक्टोबर रोजी भारताचे पंतप्रधान अहमदनगर येथील राहता तालुक्यामध्ये येणार असून त्यावेळेस गनिमी कावा करून काळ्या फिती लावून पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवणार असल्याचे अहमदनगर जिल्हा शेतकरी विकास संघर्ष समितीचे अध्यक्ष विलास कराळे पाटील यांनी सांगितले.

मोदींच्या सभेला गर्दी गोळा करण्याची सक्ती का? बाळासाहेब थोरात यांचा सवाल

दरम्यान, नुकताच ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत पार पडला होता. मोदींच्या सभेसाठी शैक्षणिक संस्थांचा उपयोग करून घेणे योग्य नाही. पंतप्रधान हे पदच असं आहे की लोक हे सभेसाठी गोळा होणारच मात्र गर्दी गोळा करण्यासाठी लोकांना सक्ती करण्याची का गरज भासत आहे, असा सवाल काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला.

Exit mobile version