Road Accident : राज्यात रस्ते अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ (Road Accident) होत आहे. आताही असाच एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या खासगी आराम बसचा कोल्हापूरजवळील पुई खडी परिसरात अपघात झाला. या अपघातात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ही दु्र्दैवी घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तत्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले. बराच वेळानंतर बसमधील 25 प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.
Road Accident : काळाचा घाला! भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू
या अपघातामुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांकडून तपास केल्यानंतर खरे कारण समोर येईल. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
रस्त्यांवर वाहनांचा वेग भरधाव असतो. त्यामुळे वाहन नियंत्रित करणे सहजासहजी शक्य होत नाही. काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातातही असेच घडले होते. गौरी गणपतीच्या सणासाठी कुटुंब पुण्याहून अमरावतीकडे निघाले होते. समृद्धी महामार्गावर असताना अचानक वन्यप्राणी आडवा आला. या प्राण्याचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात कार तीन वेळा पलटी झाली. कारची वेगात होती. त्यामुळे वेगातच पलटी झाली. या अपघातात कुटुंबातील महिला ठार झाली. तर अन्य तीन प्रवासी जखमी जखमी झाले. या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सातत्याने केली जात आहे.
रस्त्याच्या कडेला पायी (Road Accident) जाणारी माणसेही असतात. गाव किंवा रहदारीचा परिसर आला की वाहनाचा वेग मर्यादित करणे आवश्यक असते. तसेच रस्त्याच्या कडेला कुणी आहे का हे देखील चालकांना पहावे लागते. मात्र, बऱ्याचदा याकडे दुर्लक्ष होते. अंतर लवकर पार करण्याच्या नादात अपघात घडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष देण्याची आणि वाहतुकीचे नियम पाळण्याची गरज आहे.