Download App

Satara News : खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनीदेवी पाटील यांचे निधन

Satara News : सातारा लोकसभा मतदारसंघाचे (Satara News) खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनीदेवी पाटील (वय 76) यांचे आज आजारपणामुळे निधन झाले. मागील काही दिवसांपासून रजनीदेवी पाटील आजारी होत्या. पुण्यातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज दुपारी मात्र त्यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. आज सायंकाळी कराड येथील वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कऱण्यात येणार आहेत.

Satara : ‘कार्यक्षम जिल्हाधिकारी’ पुरस्कार मिळाला अन् 48 तासांतच तडकाफडकी उचलबांगडी

रजनीदेवी पाटील यांचा जन्म 26 जुलै 1948 रोजी झाला होता. 16 मे 1968 रोजी त्यांचा श्रीनिवास पाटील यांच्याबरोबर विवाह झाला होता. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रत्येक कार्यात त्यांचा सहभाग असायचा. रजनीदेवी पाटील माई या नावाने ओळखल्या जात होत्या. त्या उच्चशिक्षित होत्या.  मागील काही दिवसांपासू त्या अस्वस्थ होत्या. त्यामुळे त्यांच्यात पुणे येथे उपचार सुरू होते. परंतु, आज त्यांची प्रकृती जास्त बिघडली होती. औषधोपचाराला प्रतिसाद दिला नाही. अखेरीस आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 

follow us