Shiv Sanman Award : साताऱ्याचे (Satara)राजघराणे आणि शिवभक्तांच्या वतीनं दिला जाणारा पहिला शिवसन्मान पुरस्कार (Shiv Sanman Award)देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi)यांना जाहीर करण्यात आला आहे. साताऱ्यामध्ये शिवजयंतीचा भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यंदाच्या शिवजयंतीला (दि.19 फेब्रुवारी 2024) सन्मानपूर्वक हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
Government Schemes : महाराष्ट्र नव तेजस्विनी योजना आहे तरी काय? कोणाला मिळणार लाभ?
हा भव्य-दिव्य असा पुरस्कार सोहळा साताऱ्यामधील सैनिक स्कूलच्या मैदानावर पार पडणार आहे. या जागेची खासदार उदयनराजे भोसले(Udayanraje Bhosale), जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, सातारा पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी पाहणी केली. त्यावेळी कार्यक्रमाची तयारी, त्या पार्श्वभूमीवर उपाययोजना, सुरक्षा व्यवस्थेसह विविध गोष्टींचा आढावा घेतला.
जय भवानी, जय शिवाजी..!🚩
हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक, आदर्श राजे, आमचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राज घराण्याच्या वतीने दिला जाणारा मानाचा “शिवसन्मान पुरस्कार” भारताचे यशस्वी मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांना घोषित झाला आहे.
तमाम शिवभक्तांसाठी हा… pic.twitter.com/y9GJ0aKFMj— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 31, 2024
साताऱ्यामधील राजगादीला राज्यात मोठा मान आहे. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट तेरावे वंशज आहेत. यंदापासून साताऱ्याचे राजघराणे आणि शिवभक्तांच्या वतीनं शिवसन्मान पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात विशेष म्हणजे पहिलाच शिवसन्मान पुरस्कार हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर करण्यात आला आहे.
Pakistan : पाकिस्तानात महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत ‘मोठ्ठी’ वाढ
त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 19 फेब्रुवारीला अर्थात शिवजयंतीला साताऱ्यामध्ये असणार आहेत. पीएम मोदी सातारा दौऱ्यावर आल्यानंतर ते स्व. लक्ष्मणराव इनामदार जलसिंचन योजनेला देखील भेट देणार आहेत.
या भागातील माण-खटाव तालुक्यातील महत्वाची जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेचं स्व. लक्ष्मणराव इनामदार जलसिंचन असं नाव दिलं आहे. लक्ष्मणराव इनामदार हे खटावचे सुपुत्र आणि पंतप्रधान मोदींचे गुरुवर्य होते.