जिल्हा बँक निवडणूक : साताऱ्यात जमलं नाही ते जयकुमार गोरेंनी सोलापूरमध्ये करून दाखवलं…

Jaykumar Gore: महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिकानंतर आता जिल्हा बँकेवर भाजपचा झेंडा फडकवला आहे.

Jaykumar Gore

Jaykumar Gore

Jaykumar Gore : सोलापूर जिल्हा मोहिते पाटलांचा बालेकिल्ला मानला जातं. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने ताकद दाखवलेली. त्यातून मोहिते कुटुंबाचे वर्चस्व सिद्ध झालेले. महायुतीची सत्ता आल्यानंतर सोलापूरचे पालकमंत्रीपद थेट ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्याकडे आलेले. त्यानंतर गोरे यांनी एक-एक बालेकिल्ला जिंकण्यास सुरुवात केली. महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिकानंतर आता जिल्हा बँकेवर (Solapur District Bank) भाजपचा झेंडा फडकवला आहे. एकदम मुरब्बी राजकारण्यांचा जिल्हा असलेल्या सोलापूरमध्ये जयकुमार गोरेंनी भाजपला कसे यश मिळवून दिले ? जिल्हा बँकेबाबत जे स्वतःच्या जिल्ह्यात साताऱ्यात घडवू शकलं नाही ते सोलापूरमध्ये त्यांनी कसं घडवून आणलं ते जाणून घेऊया..


तेव्हा देखील नातं बाजूला ठेवून लढलो! रोहित पवारांचा भाजपसोबत जाण्यास विरोध, वेगळी वाट धरण्याचे संकेत

सातारा आणि सोलापूर जिल्हा बँका ताब्यात घेण्यासाठी भाजपने रणनिती आखली होती. दोन्ही बँक ताब्यात घेण्याची महत्त्वाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टाकली होती. परंतु दोन्ही ठिकाणी काही जागा बिनविरोध झाल्या. पण काही जागांवर निवडणुका झाल्या. सातारा जिल्हा बँकेत भाजपचे सर्वाधिक संचालक असताना राष्ट्रवादी व शिवसेनेने एकत्र येत बँक ताब्यात घेतली होती. त्यावरून जयकुमार गोरे यांनी मंत्री शंभूराज देसाई यांनी महायुती धर्म पाळला नाही. दम होता तर निवडणूक स्वतंत्र लढायची होती, बदल्याची आणि जखमा भरण्याची भाषा करणाऱ्यांच्यात दम होता तर त्यांनी समोरासमोर लढाई करायची होती, असके चॅलेंज दिले होते.


स्वराज्याच्या गुप्त मोहिमांचा थरार आता मोठ्या पडद्यावर; ‘बहिर्जी’च्या मोशन पोस्टरने वाढवली उत्सुकता!

भाजपने जिल्हा बँक सहज ताब्यात घेतली
सातारा जिल्हा बँकेत जे घडलं ते त्यांनी सोलापूर जिल्हा बँकेत होऊ दिले नाही. स्थानिक नेत्यांशी समन्वय साधत काही तडजोडी करत 10 जागा बिनविरोध केल्या. त्यावरून जिल्हा बँक भाजपच्या ताब्यात जाणार हे स्पष्ट झाले होते. उर्वरित नऊ जागांसाठी निवडणूक झाली. त्यात आठ जागा भाजप पृरस्कृत सहकार विकास पॅनेलने जिंकल्या. अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांच्या रुपाने मोहिते-पाटील यांच्या पॅनेलला फक्त माळशिरस सोसायटी मतदारसंघाची एक जागा जिंकता आली आहे.

समविचारी नेत्यांची मोट बांधली
शिवसेना, राष्ट्रवादी आणि इतर पक्षातील लोकांना सोबत घेऊन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा बँकेसाठी डाव टाकलाच. शिवाय बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, पंढरपूरचे प्रशांत परिचारक, मंगळवेढ्याचे सिद्धेश्वर आवताडे, माढ्याचे यशराज शिंदे आणि सांगोल्याचे शेकाप आमदार बाबासाहेब देशमुख यासारख्या या नेत्यांना एकत्र केले. तर मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांची दोन्ही मुले बाळराजे आणि अजिंक्यराणा पाटील यांना संचालक केले. सोलापूरमध्ये जयकुमार गोरे यांनी स्थानिक नेत्यांची मोट बांधली, प्रसंगी तडतोडी करत उमेदवारी देत निवडूनही आणले आहे.

खासदार मोहितेंची निवडणुकीतून माघार
मोहिते कुटुंबातील केवळ जिल्हा परिषद सदस्य अर्जुनसिंह मोहिते पाटील हेच रिंगणात होते. तर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी एेनेवळी माघार घेतली होती. भाजपसोबत जिल्ह्यातील मातब्बर मंडळी होती. त्यामुळेही भाजपसाठी ही निवडणूक सोपी झाली होती. मोहिते कुटुंबाची म्हणावी तशी ताकद दिसून आली नाहीत. त्यामुळे तब्बल चाळीस वर्षानंतर बँक भाजपच्या ताब्यात गेलीय.

Exit mobile version