Download App

Satyajit Tambe: नाना पटोलेंनी अर्धसत्य सांगितलं; मी सत्य मांडेन, तेव्हा सर्वजण चकीत व्हाल

  • Written By: Last Updated:

अहमदनगर : महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांच्या प्रचारासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) अहमदनगरमध्ये (Ahmednagar) आले असता त्यांनी तांबे पिता-पुत्रांवर टीकेची झोड उठवली.

तांबे कुटुंबातील वादात काँग्रेसला ओढू नये. मी बाळासाहेब थोरातांशी (Balasaheb Thorat) 12 जानेवारीला तांबे संदर्भात चर्चा केली होती. त्या चर्चेविषयी मी सध्या काही बोलणार नाही. योग्य वेळी बोलेन असे सांगितले होते. यावर सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी सांगितले की पटोले यांचे वक्यव्य अर्धसत्य आहे. पुर्ण सत्य मी लवकरच सांगेल, असे वक्तव्य केले.

नाना पटोलेंच्या आरोपावर बोलताना सत्यजित तांबे म्हणाले, या विषयावर आम्ही ज्यावेळी राजकीय भूमिका मांडू त्यावेळी बोलणार आहे. हे अर्ध सत्य आहे. ज्यावेळी मी सत्य मांडेल त्यावेळी आपण सर्वजण चकीत व्हाल, असं सत्यजित तांबे म्हणाले.

भाजपच्या वरिष्ठांकडून सत्यजित तांबेंना मदत करण्याचे आदेश असल्याची चर्चा आहे. यावर तांबे म्हणाले, ही फक्त चर्चा आहे. तसे काही लेखी आदेश आहेत का? मी कोणत्याही भाजपच्या नेत्यांना संपर्क केला नाही आणि त्यांनी देखील माझ्याशी संपर्क केला नाही.

भाजपचा पाठिंबा घेणार का? यावर तांबे म्हणाले, मी अपक्ष उमेदवार आहे. सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते आमच्या परिवारासोबत जोडलेले आहेत. याच कारण म्हणजे आम्ही राजकारण करताना कधीही पक्षीय भेदाभेद पाळला नाही. सर्वांनाच मदत करण्याच काम आमच्या वडिलांनी केलं. त्यामुळे सगळ्याचं पक्षाचे नेते आम्हाला पाठिंबा देत आहेत.

मी २२ वर्षांपासून काँग्रेसचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. विविध पदांवर काम केले आहे. त्याच माध्यमातून या मतदारसंघातही परिवाराप्रमाणे जोडलो गेले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने मधल्या काळात जे राजकारण झाले, त्यावर मला आता काहीच बोलायचे नाही. वेळ आल्यावर यावर सविस्तर बोलणार आहे, असं तांबे म्हणाले.

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघातील निवडणुकाच्या जाहीर प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. तांबे यांनी प्रचाराची सांगता अहमदनगरमध्ये केली. यानिमित्त आयोजित पदवीधरांच्या मेळाव्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

Tags

follow us