Download App

Crime : ‘त्या’ सात जणांची हत्याच! खूनाचा गुन्हा दाखल, दोघे ताब्यात

पुणे : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याच्या पारनेरमधील (Parner) सात जणांच्या आत्महत्या प्रकरणात खळबळजनक माहिती समोर आली आहे. ही आत्महत्या (Sucide)नसून त्यांचा खून (Murder) झाल्याची माहिती समोर आली आहे. मयताच्या चार चुलत भावांनी त्या सात जणांचा खून केलाय. आरोपीच्या मुलाचा अपघात करुन मयतानं खून केल्याच्या संशयातून सात जणाची हत्या करुन भिमा नदी पात्रात मृतदेह फेकल्याची माहिती समोर आलंय. हे खून कौटुंबिक वादातून झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. यामध्ये आतापर्यंत दोघा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय.

दौंडमधील भीमा नदीपात्रात आढळलेल्या सात मृतदेहांबाबत आत्महत्येचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांच्या तपातसात (Police Investigation) हे समोर आलंय.

शवविच्छेदनात हा खूनाचा प्रकार नसल्याचं समोर आलं होतं. तरीही पोलिसांनी मात्र घातपाताच्या दिशेनं या घटनेचा तपास केला आणि हा नियोजनबध्द खून असल्याचं त्यांच्या तपासात समोर आलंय.

हे कुटूंबं मूळचं बीड (Beed) व उस्मानाबाद (Osmanabad)जिल्ह्यातील आहेत, मात्र ते उदरनिर्वाहासाठी नगरच्या पारनेर तालुक्यातील निघोज येथे राहात होते. तेथील मोहन पवार व त्याच्या कुटुंबातील सात जणांचे मृतदेह भिमानदीपात्रात आढळल्यानं राज्यभरात एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं.

या घटनेमध्ये मोहन उत्तम पवार ( वय 48), संगिता मोहन पवार (वय 45), राणी शाम फुलवरे (वय 25), शाम फुलवरे ( वय 28), रितेश उर्फ भैय्या शाम फुलवरे (वय 7), छोटू शाम फुलवरे (वय 5वर्षे), कृष्णा शाम फुलवरे (वय 30 वर्षे) या सात जणांचा मृतदेह आढळले.

मोहन पवार यांचा पुण्यातला मुलगा राहुलच्या सांगण्यानुसार मुलानं पळवून नेलेल्या विवाहित मुलीमुळं या कुटुंबानं आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज होता. त्यानंतरही पोलिसांच्या तपासात आणखी एक माहिती समोर आल्याचं समजतंय. पोलिसांनी आतापर्यंत याची माहिती दिली नाही, निघोज येथून गेलेले पवार कुटुंबिय कोणालाच माहिती नव्हते अशी माहिती सुरवातीला देणाऱ्या पवार याच्या नातेवाईकांचीही पारगाव परिसरात 17 जानेवारीला उपस्थित होते, त्यामुळं पोलिसांचा संशय दृढ झाला.

त्यातच शिरूर- हवेली तालुक्यातील एका अपघाताच्या घटनेनंतर अमोलनेच आपल्या मुलाचा अपघात घडवल्याचा संशय असल्याच्या कारणावरून निघोज येथीलच मोहन पवार याच्या नातेवाईकांनी या खूनाचा कट रचल्याचा संशय पोलिसांना आला आणि त्यातून पोलीस खूनाच्या संशयापर्यंत पोहोचले आणि त्यातून दोघांना ताब्यात घेतलं आणि रात्री त्यांनी खूनाची कबुली दिल्याची माहिती समोर आलीय. अतिशय शांत डोक्यानं केलेल्या दोन कुटुंबांच्या या खूनाचं खरं कारण नक्की काय आहे? त्यात संपूर्ण दोन कुटुंबांतील लहान मुलांचाही खून करण्यात आलाय.

Tags

follow us