जगण्याची इच्छा नसल्याचे पत्र टाकून पोलिस कर्मचारी गायब…

श्रीगोंदा : वकिलाच्या त्रासाला कंटाळून आपल्याला जगण्याची इच्छा नसल्याचे सांगत एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या सहकाऱ्यांना मेसेज केला. मेसेज करून सदर पोलीस कर्मचाऱ्याने आपला मोबाईल बंद करून कोठेतरी निघून गेला. हा धक्कादायक प्रकार श्रीगोंदा पोलीस ठाण्यात घडला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलीस प्रशासन त्या कर्मचाऱ्याचा शोध घेत असून रात्री उशिरा पर्यंत त्या कर्मचाऱ्याचा […]

Untitled Design   2023 03 28T201917.511

Untitled Design 2023 03 28T201917.511

श्रीगोंदा : वकिलाच्या त्रासाला कंटाळून आपल्याला जगण्याची इच्छा नसल्याचे सांगत एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या सहकाऱ्यांना मेसेज केला. मेसेज करून सदर पोलीस कर्मचाऱ्याने आपला मोबाईल बंद करून कोठेतरी निघून गेला. हा धक्कादायक प्रकार श्रीगोंदा पोलीस ठाण्यात घडला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलीस प्रशासन त्या कर्मचाऱ्याचा शोध घेत असून रात्री उशिरा पर्यंत त्या कर्मचाऱ्याचा शोध लागला नाही.

याबाबत अधिक माहिती अशी, श्रीगोंदा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याची शहरातील एका नामांकित वकीलाशी दि.27 रोजी गुन्हा दाखल करण्यावरून मतभेद झाले. या गोष्टीमुळे नाराज झालेल्या वकिलांनी त्याचे विरुद्ध आझाद मैदान येथे उपोषण करणार असल्याचे लेखी निवेदन दिले.

सोशल मीडियावर पोस्ट करताय तर सावधान… पोलिसांचा असणार वॉच!

तसेच त्या पोलिस कर्मचाऱ्याची कार्यकाळातील सर्व माहिती मागितली. यामुळे दबावात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने आपल्या सहकारी असलेल्या पोलिस अमलदाराला लेखी पत्र लिहिले. त्या पत्रात गुन्हा दाखल करण्यात माझा कोणताही संबंध नसताना त्या वकिलांनी विनाकारण मला मानसिक त्रास दिल्याचे लिहिले.

लोकसभा अध्यक्ष अडचणीत? विरोधी पक्षांनी आखली ‘ही’ रणनीती

“मला आता जगण्याची इच्छा राहिली नाही ” असे त्या वकिलांनी लिहिले आहे. तसेच तुम्ही बीट केलेले आहे तुमच्या कडे बघतो अशी धमकी वकिलाने दिल्याचे पत्रात लिहिले आहे. “माझ्या जीवास काही झाले तर त्याला ते वकील जबाबदार असतील असे त्या पत्रात लिहले.

Exit mobile version