Download App

पुणे-बंगळुर महामार्गावर भरधाव ट्रकने मजुरांना चिरडले, 4 जागीच ठार, 8 जखमी

  • Written By: Last Updated:

Kolhapur Accident: गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अपघाताच्या घटना समोर येत आहेत. आताही कोल्हापूर जिल्ह्यातून (Kolhapur Accident) भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. रस्त्याच्या कडेला सिमेंट काँक्रीट मिक्सर मशिन (Cement Concrete Mixer Machine) लावत असतांना पाठीमागून आलेल्या ट्रकने मजुरांना जोरदार धडक दिली. या घटनेत ४ मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर 8 जण जखमी झाले आहेत. ही दुर्दैवी घटना रविवारी (दि. 17) रात्री आठच्या सुमारास पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाठार (ता. हातकणंगले) येथील पुलाजवळ घडली.

Shivani Bawkar : शिवानी बावकरचा कातिला अंदाज पाहून चाहेत फिदा 

सचिन धनवडे (वय 40), बाबालाल इमाम मुजावर (वय 50), विकास वड्ड (वय 32), श्रीकेश्वर पासवान (वय 60) अशी मृतांची नावे आहेत. अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री भादोले येथून एक मजुरांचा एक गट आपलं काम आटोपून कोल्हापूर शहराजवळील शिये गावात स्लॅब टाकण्यासाठी मिक्सर घेऊन आला होता.
मजुरांच्या टेम्पोला पाठीमागे स्लॅब टाकणार मिक्सर जोडलेला होता. यावेळी त्यांचा टेम्पो पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाठार येथील सर्व्हिस रोडवर आला. दुसऱ्या दिवशी याच ठिकाणी काँक्रिटीकरणाचे करायचे असल्यानं पाठीमागील मिक्सर मशीन तिथेच सोडून जाण्यासाठी मजूर खाली उतरले. मिक्सर बाजूला उभा करत असताना कोल्हापूरकडून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने या सर्व कामगारांना उडवले.

Horoscope Today: ‘मिथुन’ राशीला मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य… 

दरम्यान, हा अपघात इतका भीषण होता की 4 मजुरांचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय 8 जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर घटनास्थळी मोठी आरडाओरड सुरू झाली. दरम्यान, या भीषण अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी रक्ताचा सडा पाहून अनेकांनाचा थऱकाप उडाला होता. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मयत मजूर हे रियाज कन्सट्रक्शन या स्लॅब टाकण्याऱ्या कंत्राटदाराकडे काम करत होते.

follow us

वेब स्टोरीज