सार्वजनिक जीवनात बाहेर पडल्यावर बरंच काही शिकत असतो. माणसांना वाचायला शिकलं पाहिजे. मी सार्वजनिक जीवनात लवकर सुरुवात केली. अशी आठवण शरद पवार यांनी आपली भाषणात सांगितली. ते आज शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकांच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते.
देशाच्या राजकारणातील असलेले खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेचे प्रकाशन 2015 साली झालं होतं. आज या पुस्तकाचा दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या प्रकाशन कार्यक्रमाला स्वतः शरद पवार, शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार, खासदार सुप्रिया सुळे, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर अरुण गुजराती, हेमंत टकले आदी मान्यवर उपस्थित होते.
Bchhu kadu : वज्रमूठ तुटणार! ‘सामंत-पवारांची भेट म्हणजे राजकीय भूकंपाचे संकेत’
यावेळी बोलताना ते म्हणाले की प्रकाशनाचा समारंभ म्हणजे हा सत्कार समारंभ आहे का, असं वाटायला लागलं आहे. सार्वजनिक जीवनात बाहेर पडल्यावर बरंच काही शिकत असतो. माणसांना वाचायला शिकलं पाहिजे. मी सार्वजनिक जीवनात लवकर सुरुवात केली. माझे भाऊ कृषी अधिकारी होते, मी त्यांच्याकडे प्रवरानगरला गेलो. त्यावेळी गोवा मुक्ती संग्रामाचा लढा चालू होता. त्यावेळी त्याला समर्थन देण्यासाठी आम्ही प्रवरानगर मध्ये आंदोलन केले. त्यावेळी मोर्चा घेऊन आम्ही प्रवरानगरमधील कारखान्यावर गेलो.
ते पुढे म्हणले की, कारखाना बंद करा, अशी मागणी केली. त्यावेळी त्यांनी विचारलं का? त्यावर पवारांनी उत्तर दिलं. गोवा मुक्ती संग्राम चालू आहे. त्याला समर्थन देण्यासाठी कारखाना बंद केला पाहिजे. त्यावर त्यांनी उत्तर दिल, जर कारखाना बंद करून गोवा मिळणार असेल तर मी कायमचा कारखाना बंद करून टाकेल. त्यावर शरद पवार यांना उत्तर देता आलं नाही.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की माझ्या आयुष्यातला मोर्चा हा होता, त्यावेळी नक्की वय किती होतं. हे सांगता येणार नाही पण नववीमध्ये असताना पहिला मोर्चा काढला होता. असा किस्सा शरद पवार यांनी आपल्या भाषणात संगितलं.
https://www.youtube.com/watch?v=BrC8eONz57Y