Devendra Fadnavis : गेल्या काही वर्षांपासून देशासह राज्यातील राजकारणात देखील हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन अनेक नेते समोर येत आहेत. या नेत्यांपैकी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आवडता हिंदुत्ववादी नेता कोण? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. तसेच या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी त्यांच्यासमोर राज्याचे मंत्री नितेश राणे, आमदार संग्राम जगताप आणि आमदार महेश लांडगे या नावांचे पर्याय ठेवण्यात आले होते.
यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, तिन्ही नेते हिंदू नायक आहेत. हिंदुत्वाकरता (Hindutva Leader ) काम करत आहेत आणि त्यांनी हिंदुत्वाकरताच काम केलं पाहिजे. पण हिंदुत्वाकरता काम करताना माझी एकच अपेक्षा आहे की, हिंदुत्वाचा मूळ गाभा हा सहिष्णुता आहे. ती सहिष्णुता आपण समजून घेतली पाहिजे. सर्वसमावेशकता असली पाहिजे. पण मी नेहमी सांगतो सर्वसमावेशकतेचा अर्थ हा नाही की, कोणी आपल्या थोबाडात मारलं तर दुसरा गाल पुढे करायचा. थोबाडात मारणाऱ्याला थोबाडातच मारली पाहिजे मात्र आपण स्वतःहून कोणाच्या थोबाडात मारु नका. हिंदू सहिष्णूच आहे आणि सहिष्णूच राहिला पाहिजे. सहिष्णुता हाच हिंदुत्वाचा दागिना आहे असं या मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सुटे तेल विक्रीला 1 वर्षांची सूट; सरकारची तुकाराम मुंढेंच्या निर्णयाला स्थगिती-
तर दुसरीकडे या मुलाखतीमध्ये त्यांना सर्वात जास्त खटकणारे विरोधी व्यक्तिमत्वबद्दल देखील प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्यांच्यासमोर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे असे पर्याय समोर ठेवण्यात आले होते मात्र यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हे तिन्ही खटकणारे नाही.
