Download App

म्हात्रेंमुळे चर्चेत आलेले आमदार प्रकाश सुर्वे नेमके आहेत तरी कोण? जाणून घ्या

मुंबई : शिवसेनेच्या नेत्या तसेच माजी नगरसेविका शीतल म्हात्रे व आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक वादग्रस्त व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरून सध्या राजकारण तापले आहे. या व्हिडीओमुळे म्हात्रे आणि सुर्वे हे चांगलेच चर्चेत आले आहे. दरम्यान उद्धव ठाकरे गटात असलेल्या शीतल म्हात्रे यांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर नुकतेच आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांच्या रॅलीतील एका आक्षेपार्ह व्हिडीओमुळे प्रकाश सुर्वे नेमके आहेत तरी कोण अशा चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया सुर्वे यांची कारकीर्द तसेच त्यांचा राजकारणातील प्रवास …

प्रकाश सुर्वे हे मागाठाणेचे आमदार आहे. राष्ट्रवादीत असलेले सुर्वे यांनी 2014 साली शिवसेनेत प्रवेश केला होता. आज भाजपात असलेले प्रवीण दरेकर हे पूर्वी मनसेत होते त्यावेळी सुर्वे यांनी त्यांच्याविरोधात विधानसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत दरेकर यांनी सुर्वे यांचा तब्बल 13 हजार मतांनी पराभव केला होता. त्यानंतर सुर्वे यांनी शिवसेनेत प्रवेश करून 2014 साली झालेल्या निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार हेमेंद्र मेहता यांचा पराभव करत ते पहिल्यांदा आमदार झाले होते.

त्यांनतर सुर्वे यांनी 2019 च्या निवडणुकीत आपली ताकद दाखवून दिली. त्यांनी मनसेचा उमेदवार नयन कदम यांचा 49 हजार मतांनी पराभव केला. शिवसेनेत झालेल्या बंडानंतर सुर्वे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला. त्यांनतर गुवाहाटीवरून परतल्यानंतर त्यांचा सामना आदित्य ठाकरे यांच्याशी झाला होता. ज्या भागात प्रकाश सुर्वे यांची पकड आहे त्याच भागाच्या शीतल म्हात्रे या नगरसेविका आहे.

शिवसेनेतील बंडानंतर शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांविरोधात शीतल म्हात्रे यांनी दांड्याची भाषा केली होती. मात्र त्यानंतर प्रकाश सुर्वे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी ठाकरे गटाची साथ सोडत त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला अशी चर्चा होती. म्हात्रे यांना शिंदे गटात प्रवक्तेपद मिळाले. त्यानंतर त्यांनी शिंदे गटाची बाजी लावून धरली.

त्यानंतर त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधण्यास सुरुवात केली. मात्र मातोश्री नावाच्या एका सोशल मीडिया पेजवरून म्हात्रे व सुर्वे यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला त्यांनतर म्हात्रे यांनी आक्रमक पवित्र घेतला. या व्हिडीओमुळे सुर्वे देखील चर्चेत आले. व्हायरल व्हिडिओनंतर म्हात्रे यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपली बाजू मांडली. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव सुर्वे हे काही या विषयावर अद्याप बोलले नाही आहे.

बोअरवेलमध्ये पडलेल्या ‘त्या’ चिमूरड्याचे प्राण वाचवण्यात अपयश

मात्र सुर्वे यांच्या मौनाचा देखील अनेक अर्थ काढले जाऊ लागले. त्यानंतर सुर्वे हे आपल्या विरोधकांना काय प्रत्युत्तर देणार हे येत्या काळात पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

शिंदे सरकारचे भवितव्य ठरणार? सत्तासंघर्षावर आज सुनावणी

दरम्यान आगामी निवडणुकांमध्ये सुर्वे यांना आपली ताकद दाखवून द्यावी लागणार आहे. निवडणुकीत त्यांना दरेकर आणि मनसेची साथ मिळाली तरच त्यांचा पुढचा प्रवास सुखकर असणार आहे. दरेकर व मनसेच्या साथीशिवाय सुर्वे यांना आगामी निवडणुकात महाविकास आघाडी सरकारचे आव्हान पेलणे जड जाईल. आगामी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकांसाठी देखील शिंदेच्या शिवसेनेला ताकद देण्याचे काम देखील सुर्वे यांना करावे लागणार आहे. दरम्यान सुर्वे आणि म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओची एसआयटी चौकशी सुरु आहे. या चौकशीनंतर सत्य समोर येईल मात्र याद्वारे राजकारणाची पातळी खालावली असल्याचे जाणवू लागले आहे.

Tags

follow us