Why Scorpio’s horrific accident happen at Ambenali Ghat? Shocking reason revealed : रायगडच्या आंबेनळी घाटात दुर्घटना समोर आली आहे. (Satara) या घाटात भीषण अपघात घडला असून स्कॉर्पिओ गाडी तब्बल 1200 फूट खोल दरीत कोसळली. यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आणि या भीषण अपघातात सातारा तालुक्यातील आसगाव गावातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
या अपघातात मृत्यू पावलेले पाज जणही एकाच गावातील एकाच रस्त्यावर राहणारे होते. त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. गावात सर्वत्र दु:खाच वातावरण आहे. महिलांचा हंबरडा, नातेवाईकांचा आक्रोश आणि सुन्न झालेली गावकऱ्यांची मनस्थिती, हे दृश्य अत्यंत हृदयद्रावक आहे. परंतु, या गावातील गावकरी आणि या कुटुंबातील सदस्यांनी या झालेल्या घटनेमध्ये शासनाला जबाबदार धरलं आहे.
कटिंग करताना हजामच्या खुर्चीवर बसताच तुम्हालाही सुटतेय का पेंग?; मग ही बातमी एकदा वाचाच…
दरम्यान या अपघातानंतर त्याची कारणं समोर येत आहेत. त्यामध्ये या घाटामध्ये रस्त्याला अनेक ठिकाणी संरक्षण भिंतच नाही. तर अनेक ठिकाणी लोखंडी बॅरिगेट्स देखील तुटलेले होते. हे असते तर गाडी थेट खोल दरीमध्ये कोसळली नसती आणि कदाचित या तरूणांचे प्राण वाचले असते. याच घाटामध्ये दापोली कृषी विद्यापीठाच्या बसचा अपघात झाला होता. त्यामध्ये 33 जणांचा मृत्यू झाला होता.
नाशिक पोलिसांची मोठी कारवाई! नोटीस मिळताच मतीन पटेल वकिलांसह हजर, SIT कडून कसून चौकशी
रस्त्याला संरक्षण कठडे नसल्यामुळे ही दुर्दैवी घटना झाल्याचे भावना व्यक्त केल्या आहेत. त्याच पद्धतीने मृत्यू झालेल्या युवकांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार शासनाने द्यावा, अशी अपेक्षा अनेक गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या दुर्घटनेत आठ तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त युवकांमध्ये पाचजण युवक हे आसगाव, ता. सातारा, जि. सातारा येथील रहिवासी असून 2 युवक मर्ढे या गावातील असून 1 व्यक्ती हा खटाव येथील आहे.
