मुंबई : आज (दि.8) जगभरात महिला दिन साजरा केला जात असून, विविध क्षेत्रात महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. मात्र, असे असतानाही भारतासह जगभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न चिंतेचा विषय बनला आहे. त्यात नुकत्याच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या, त्याआधी महायुती सरकराने महिलांसाठी ‘लाडकी बहीण योजना’ आणली. ही योजना अल्पावधित लोकप्रिय झाली आणि पुन्हा एकदा सत्तेत महायुती सरकारर आले पण, त्याच लाडक्या बहिणींव आज अमानुष अत्याचार केले जात आहे. याच गोष्टींवर काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार (Vijay Wadettiwar) यांनी महिलांना उद्देशुन खुलं पत्र लिहिले आहे. ज्यात त्यांनी अनेक प्रश्नांवर लक्ष वेधत सत्ता आली पण एखादा भाऊ इतका बेईमान असू शकतो का? असा बोचरा प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारला आहे. (Vijay Wadettiwar Write Letter To Women)
Video : पुण्यात श्रीमंत बापाच्या पोराचा भररस्त्यात ‘नंगानाच’; पहिले लघूशंका केली अन् मग…
वडेट्टीवार यांच्या पत्रात नेमकं काय?
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी लिहिलेल्या पत्रात आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या तुला खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत. पुढे ते लिहितात ताई तुझा सन्मान म्हणून सरकारने लाडकी बहिण योजना सुरू केली. आम्हाला ही आमच्या बहिणीचा मान ठेवायचा होता,या योजनेचे आम्ही देखील स्वागत केले! आपण सर्व लाडक्या बहिणींनी या सन्मान पोटी महायुतीच्या झोळीत भरभरून मत टाकली. आणि तुमच्या आशीर्वादाने सरकार सत्तेत आले.
‘आम्हाला एक खून माफ करा…’, रोहिणी खडसेंचं ‘महिला दिनी’ थेट राष्ट्रपतींना पत्र, नेमकं प्रकरण काय?
ताई, सत्ता आली पण एखादा भाऊ इतका बेईमान असू शकतो का? सध्याचे जे चित्र आहे त्यामुळे हा प्रश्न पडत आहे. निवडणुकीत मत हवी म्हणून कोणत्याही अटी शर्ती न घालत बेगडी प्रेम दाखवले. तुमच्या खात्यात आधीच ओवाळणी दिली. निवडणुकीत भावांचे अधिक प्रेम आहे दाखवण्यासाठी महायुती सरकार आल्यास २१०० रुपये देण्याचे अभिवचन दिले होते. पण आता मात्र विविध निकष लावून तुझे नाव वगळण्याची बेइमानी सुरु केली हे अन्यायकारक आहे. मनाला खंत वाटते तुझे मत घेताना इतकी बनवाबनवी केली नव्हती, मग हेतू साध्य झाल्यावर मात्र अटी शर्ती का लावण्यात आल्या?
लाडक्या बहिणींना सरकारने किती कोटी वाटले? आर्थिक पाहणी अहवालातून मोठी माहिती समोर
कोणताही भाऊ एका बहिणीशी अस वागू शकतो का हा प्रश्न नक्कीच तुला पडला असेल. मतांच्या लाचारी साठी बहिणीवर उसने प्रेम दाखवणाऱ्या या बेईमान भावांना तू माफ करशील का? एकीकडे महिलादिन, महिलांच्या कर्तृत्वाचा अभिमान, आदर आणि दुसरीकडे हेच लाडके भाऊच तुमची फसवणूक करत आहेत ! ताई, या राज्यात तुला सुरक्षित वाटते का? दररोज महिला अत्याचाराच्या घटना ऐकून आम्हाला वेदना होतात.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राज्यातील लाडक्या बहिणींना खुले पत्र. pic.twitter.com/F9VQVZljTS
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) March 8, 2025
तू आई आहेस, तू बहिण आहे
ताई, तू एक मुलगी देखील आहेस
अनेक नात्यात गुंतलेली तू माऊली आहेस. कोणत्याही क्षेत्रात भरारी घेऊन पुरुषांच्या पुढे जाण्याची शक्ती तुझ्यात आहे. पण जर तुलाच सुरक्षित वाटत नसेल तर आम्ही नालायक भाऊ ठरतो! तुझ्या वेदना आमच्याही आहेत, रोज घडणारे अत्याचार बघून लाज आम्हाला ही वाटते.
तू दुर्गा
तू जिजाऊ
तू सावित्री
तू रमाई आहेस
अन्याया विरोधात लढण्याची शक्ती तुझ्यात आहे.
ताई आज तरी तू शांत आहेस , तुझ्यात दुःख पचविण्याची खूप क्षमता असली तरी आता मात्र तुझे रौद्र रूप या लाडक्या भावांना दाखवण्याची वेळ आली आहे.
तुझ्याकडून या भावाच्या इतक्याच अपेक्षा!
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा.
तुमचा भाऊ
विजय वडेट्टीवार