Download App

अजित पवारांचा निर्णय कोण घेणार? शरद पवारांचे सूचक विधान

NCP Leader Ajit Pawar and Supriya sule : मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नुकतीच विरोधी पक्ष नेतेपद सोडून पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आगामी काळात नेमकी त्यांना काय जबाबदारी मिळणार याबाबतची उत्सुकता आहे. दरम्यान, हा निर्णय आता राष्ट्रवादीचे नवीन कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्राची जबाबदारी असलेल्या सुप्रिया सुळेंच्या कोर्टात असल्याची माहिती आहे. याबाबत आज (26 जून) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूचक व्यक्तव्य केलं. (Working President Supriya Sule will take decision of Ajit Pawar roll in ncp)

बारामती येथे पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार बोलतं होते. यावेळी पवार म्हणाले, “हा निर्णय कुणी एकटा घेत नसतो. अजित पवारांसह प्रमुख लोक बसतील आणि त्यासंदर्भातला निर्णय घेतील. आज पक्षसंघटनेच्या कामात सगळ्यांनीच लक्ष द्यावं अशी भावना आहे. तेच मत त्यांनी व्यक्त केलं. त्यापेक्षा वेगळं काही नाही. त्यामुळे यासंदर्भात स्वत: अजित पवारांसह प्रमुख लोक बसून निर्णय घेतील, असंही पवार यांनी स्पष्ट केलं.

‘त्यावेळी ते प्राथमिक शाळेत असतील’; पवारांनी उडवली फडणवीसांच्या वक्तव्याची खिल्ली

अजित पवार काय म्हणाले होते :

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिन सोहळ्यात बोलताना पवार यांनी विरोधी पक्ष नेतेपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. ते म्हणाले होते, विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्याची आपली अजिबात इच्छा नव्हती. पण, आमदारांचा आग्रह आणि त्यांनी स्वाक्षऱ्या गोळा केल्याने ते पद स्वीकारले. गेले वर्षभर काम केले. मात्र, आता हे पुरे झाले. आता पक्ष संघटनेत कोणतीही जबाबदारी द्या”, असं अजित पवारांनी म्हटलं होतं.

“कॅबिनेटसाठी गुलाबराव पाटील राऊतांच्या दारात उभे होते; घ्या सप्तश्रृंगीची शपथ…”; ठाकरे गटाचा नेता भिडला

 देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला :

दरम्यान, यावेळी बोलताना पवार यांनी भाजपचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला. फडणवीस यांनी शरद पवारांच्या 1977  साली स्थापन केलेल्या पुलोद सरकारवरुन प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर पवारांनी सडेतोड उत्तर दिले. त्यावेळी फडणवीस प्राथमिक शाळेत असतील, ते अज्ञानापोटी अशी वक्तव्य करत असतात, असा टोला पवारांनी फडणवीसांना लगावला.

Tags

follow us