काल निवडणूक आयोगाने याचा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला दिलं आहे. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांची मोठी कोंडी केली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर अनेक प्रश्न तयार झाले आहेत. त्यावर सोशल मीडियावर अनेक प्रतिकिया येत आहेत. भाजपचं ट्विटर अकौंटवरून देखील यावर टीका करण्यात आली आहे
काम फत्ते … #EknathShinde #शिवसेना pic.twitter.com/tThd96VK4V
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 17, 2023
भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार संजय राऊत यांचा फोटो ट्विट करत ‘काम फत्ते’ असे कॅप्शन दिले आहे.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला शिवसेना पक्ष (Shivsena) व धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे (Udhav Thackrey) यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला. शिंदे व त्यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांना चोर म्हटले आहे. त्याला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तुम्ही धनुष्यबाण काँग्रेस-राष्ट्रवादीकडे गहाण ठेवला होता. तो मी सोडविला आहे. तुम्ही घातक आहात. लोकशाहीचा खून तुमच्या वक्तव्याहून होत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे.
शिंदे म्हणाले, शेवटी कोणी किती काही म्हटले तरी सत्य लपविता येत नाही. खऱ्या अर्थाने आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे. जे कोणी आज काही बोलतायत. त्यांनी २०१९ ला बाळासाहेबांची विचार कोणाच्या तरी दावणीला बांधले होते. त्यांचे विचार विकण्याचे मोठे पाप केले आहे. त्यांना ही चपराक आहे.