Download App

मुंबई हादरली! प्रेयसी दुसऱ्याच्या प्रेमात पडल्याचं समजताच रचला प्लॅन, मित्रांच्या मदतीने अपहरण अन्…

गुरुवारी रात्री, मुख्य आरोपी असलेल्या असीम (नाव बदललं आहे) याने पीडित तरुणीच्या भावाला ओलीस धरले आणि त्याच्यावर दबाव

  • Written By: Last Updated:

Girls kidnapped and Gang-Raped In Mumbai : मुंबईत एक संतापजनक घटना घडली आहे. २२ वर्षीय तरुणीचे तिच्या एक्स बॉयफ्रेंडने पाच मित्रांच्या मदतीने अपहरण केले आणि त्यानंतर चार जणांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. (Rape) ही धक्कादायक घटना भिवंडीतील शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत केवळ एकाच आरोपीला अटक झाली आहे. उर्वरित आरोपी अद्याप फरार आहेत.

संतापाचा भयंकर परिणाम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि मुख्य आरोपी (एक्स बॉयफ्रेंड) हे दोघेही एका गावातील रहिवासी आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, चार महिन्यांपूर्वी दोघांमध्ये ब्रेकअप झाला. पीडितेने दुसऱ्या व्यक्तीसोबत नवीन नाते जोडल्याचं समजताच, तिच्या एक्स बॉयफ्रेंडला हे सहन झालं नाही. संतापाच्या भरात त्याने आपल्या पाच मित्रांच्या मदतीने तिच्याशी सूड घेण्याचा कट रचला.

छावा चित्रपटाला गेले अन् चांगलेच फसले; पुणे पोलिसांकडून मोक्का लागलेले आरोपी अटक

गुरुवारी रात्री, मुख्य आरोपी असलेल्या असीम (नाव बदललं आहे) याने पीडित तरुणीच्या भावाला ओलीस धरले आणि त्याच्यावर दबाव टाकून त्याच्या बहिणीला एका ठिकाणी बोलावण्यास भाग पाडलं. पीडित तरुणी झोपेत असताना, तिला आपल्या भावाकडून १५ मिस्ड कॉल्स आल्याचं दिसलं. रात्री १:१५ वाजता तिने फोन उचलला असता, भावाने ताप असल्याचं सांगून तिला एका ठिकाणी येण्यास सांगितलं.

एका मागोमाग एक ठिकाणी अत्याचार

ही तरुणी तातडीने रिक्षाने त्या ठिकाणी पोहोचली. मात्र, तिथे तिच्या भावासह तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि त्याचे पाच मित्र आधीच थांबले होते. त्यांनी तिच्या भावाला आणि रिक्षाचालकाला बेदम मारहाण केली. यानंतर, जबरदस्तीने तरुणीला रिक्षात बसवून आरोपींनी तिला एका शाळेच्या मागील जंगलात नेले. तिथे चार आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. त्यावरच न थांबता, आरोपींनी तिला दुसऱ्या एका ठिकाणी नेऊन, एका पिकअप व्हॅनमध्ये पुन्हा तिच्यावर अत्याचार केले.

सहा आरोपींविरुद्ध गुन्हा, एकला अटक

या प्रकरणात, शांतिनगर पोलिसांनी सहा आरोपींविरुद्ध अपहरण आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आतापर्यंत केवळ एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. उर्वरित पाच आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सर्व आरोपी २० ते २५ वयोगटातील आहेत. त्यांना अटक करण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.

संपूर्ण शहर हादरले

ही घटना उघड होताच संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे. महिला सुरक्षा हा गंभीर प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणात तातडीने कारवाई करत आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ही घटना केवळ भिवंडीपुरती मर्यादित नाही. देशभरात महिला सुरक्षेचे प्रश्न ऐरणीवर येत आहेत. अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी कडक कायद्यांची अंमलबजावणी आणि जलद न्याय मिळणे अत्यावश्यक आहे.

follow us