Download App

Pune fire : पुण्यातील जुना बाजार परिसरात अग्नितांडव; आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न

  • Written By: Last Updated:

Pune fire : पुणे : पुण्यातील मंगळवार पेठ येथील जुना बाजार झोपडपट्टी परिसरात भीषण आग लागली आहे. येथे लागलेल्या आगीची माहिती मिळताच पुणे महापालिका (Pune corporation) अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरू आहेत.

दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. जुना बाजार येथे दुकानांना मोठी आग लागल्याची माहिती मिळाली असून आगीमुळे परिसरात धुराचे लोळ उठले होते. आज सकाळी ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे.

मंगळवार पेठेतील या जुना बाजारात वायरिंग, इलेक्ट्रिकल, लाकडी फर्निचर अशी दुकानं आहेत. प्राथमिक माहितीनुसार, या आगीत कोणी ही जखमी झालेले नाही.

मात्र, या आगीत ७ ते ८ दुकानांना मोठी आग लागली आहे. अग्निशमन दलाकडून मोठ्या शर्थीने आग विझविण्याचे काम सुरू आहे. मात्र, आग नेमकी कशामुळे लागली होती याची पूर्तता झालेली नाही.

Tags

follow us