Download App

प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा : ईडीच्या ताब्यातील 180 कोटींच्या मालमत्तेबाबत ‘गुडन्यूज’

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ईडीच्या ताब्यात असलेली त्यांची तब्बल 180 कोटींची मालमत्ता परत मिळणार आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ईडीच्या ताब्यात असलेली त्यांची तब्बल 180 कोटींची मालमत्ता परत मिळणार आहे. SAFEMA अर्थात स्मगलर्स अँड फॉरेन एक्स्चेंज मॅनिप्युलेटर्स ॲक्टच्या अपील न्यायाधिकरणाने ही संपत्ती परत करण्याचे आदेश दिले आहेत. ईडीने काही महिन्यांपूर्वी अंडरवर्ल्डचा गँगस्टर आणि ड्रग्जतस्तक इक्बाल मिर्ची (Iqbal Mirchi) केस प्रकरणात पटेल आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या दक्षिण मुंबईतील वरळी येथील सीजे हाऊसच्या 12व्या आणि 15व्या मजलव्यावरील सदनिका जप्त केल्या होत्या. (A huge relief to Praful Patel, a Mumbai court has quashed an Enforcement Directorate order seeking to attach his properties worth over ₹ 180 crore.)

प्रफुल्ल पटेल यांच्या दक्षिण मुंबईतील वरळी येथील सीजे हाऊसच्या 12व्या आणि 15व्या मजलव्यावर दोन सदनिका आहेत. प्रफुल्ल पटेल यांच्या पत्नी वर्षा आणि मिलेनियम डेव्हलपर या कंपनीच्या नावावर आहेत. या मालमत्तेची बाजारभावानुसार 180 कोटी किंमत आहे. ईडीच्या दाव्यानुसार, पटेल यांनी ही मालमत्ता हाजरा मेमन या इक्बाल मिर्चीच्या पहिल्या पत्नीकडून बेकायदेशीरपणे खरेदी केली आहे.

ओडिशात भाजपचा ऐतिहासिक विजय, मुख्यमंत्री पदांसाठी ‘हे’ नाव चर्चेत

इक्बाल मिर्चीचा 2013 मध्ये लंडनमध्ये मृत्यू झाला होता. त्याला कुख्यात ड्रग माफिया आणि गँगस्टर दाऊद इब्राहिमचा उजवा हात मानला जात होता. याशिवाय 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी होता. त्यानंतर ईडीने पटेल यांच्या या दोन्ही सदनिका जप्त केल्या होत्या. आता स्मगलर्स अँड फॉरेन एक्स्चेंज मॅनिप्युलेटर्स ॲक्टच्या अपील न्यायाधिकरणाने ही संपत्ती परत करण्याचे आदेश दिले आहेत.

निवडणुकीचा वाद टोकाला ! लंके समर्थक राहुल झावरेंसह 24 जणांविरुद्ध विनयभंग, अॅट्रासिटीचा गुन्हा

ईडीचा संलग्नक आदेश फेटाळताना, न्यायाधिकरणाने सांगितले की श्री पटेल यांच्या विरोधात तपास यंत्रणेची ही कारवाई बेकायदेशीर आहे. मालमत्ता मनी लाँड्रिंगमध्ये गुंतलेली नाही. या मालमत्तेचा मिर्चीशीही काही संबंध नाही, असा निर्वाळा न्यायाधिकरणाने दिला आहे. न्यायाधिकणाच्या या आदेशावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. भाजपवर “वॉशिंग मशीन”चे आरोप होऊ लागले आहे. प्रफुल्ल पटेल हे सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आहेत. सध्या ते राज्यसभेचे खासदार असून नवीन मोदी मंत्रिमंडळात मंत्री म्हणून वर्णी लागण्याची शक्यता आहे.

Tags

follow us