Download App

मुंबईच्या स्वच्छतेवरून Aaditya Thackeray यांचा सरकारवर निशाणा; भाजप म्हणते जरा लाज वाटू…

  • Written By: Last Updated:

मुंबई : मुंबईतील (BMC) स्वच्छेतेवरून आमदार आदित्य ठाकरे यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांना एक पत्र लिहिले आहे. त्या पत्रात राज्य सरकारवर ठाकरे यांनी आरोप केले आहेत. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा निशाणा थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर आहे. सध्याची बीएमसी बेकायदेशीर राज्य सरकारच्या बिल्डर आणि कंत्राटदार मित्रांसाठी काम करत आहेत, असा आरोप आदित्य ठाकरेंचा आहे. त्याला आता भाजपनेच आपल्या एक्सवरून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. स्वच्छतेच्या क्रमवारीत मुंबई 31 व्या क्रमांकावर आली आहे. नाकं मुरडत भाजपवर निर्लज्जपणे खापर फोडत आहात… पण जरा लाज वाटू द्या.. असा हल्ला भाजपने केलाय.


ISKCON वर केलेले आरोप मनेका गांधींना भोवणार? इस्कॉनकडून 100 कोटींचा दावा…

आदित्य ठाकरे यांनी गेल्या काही महिन्यांपासून मुंबईतील स्वच्छतेच्या भीषण होत चाललेल्या अवस्थेबद्दल बीएमसीला पत्र लिहिले. महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना हे पत्र लिहिले आहे. मुंबई शहरामध्ये गेल्या तीन महिन्यांपासून अनेक नागरिकांनी संपूर्ण मुंबईत कचऱ्याचे ढीग वाढत असल्याच्या तक्रारी केल्या आहे. बीएमसी संपूर्ण मुंबईमध्ये कुठल्याच विभागामध्ये कचरा गोळा करण्याचे काम नियमितपणे करताना दिसत नाहीत. मुंबई महानगरपालिकेमध्ये गेले वर्षभरापासून निवडून आलेले लोकप्रतिनिधी नाहीत. पंधरा प्रभाग अधिकारी (सहाय्यक आयुक्त) यांच्या जागा रिक्त आहेत. अशा परिस्थितीमध्ये मुंबईतील नागरिकांना तक्रार कुठे करायची ? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला आहे.

सोशल मीडियावरील तक्रारींना कॉपी पेस्ट उत्तरे मिळतात. पण प्रत्यक्षात कोणतेही काम होताना दिसत नाही. शहरातील सर्वच वॉर्डातील कचरा वेळेवर उचलला जात नसल्याचे खरे कारण का ? कृपया नागरिकांच्या हितासाठी कारवाई करा. जसे सध्याची बीएमसी बेकायदेशीर राज्य सरकारच्या बिल्डर आणि कंत्राटदार मित्रांसाठी काम करत आहेत, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय.


Ajit Pawar सर्व गणपतींना गेले, पण ‘वर्षा’वर जाणं टाळलं, शिंदेंचे विश्वासू म्हणतात…

आदित्य ठाकरेंच्या आरोपला भाजपने उत्तर दिले आहे. दुर्देवाने दोन दशकांपेक्षा जास्त काळ मुंबईची सत्ता उद्धव ठाकरेंच्या हातात होती. मात्र आशियातल्या महानगरपालिकांपेक्षा सर्वात जास्त बजेट असलेले शहर म्हणजे ‘आपली मुंबई’ची त्यांनी तुंबई केली. मिठी नदी असो की समुद्र त्यात तुम्ही खुशाल गटारीचे आणि घाणीचे पाणी सोडलेत. मात्र मुंबईत इतक्या वर्षात साधा सिव्हरेज प्लांट तुम्हाला उभारता आला नाही. भाजपच्या सत्तेत केंद्र आणि राज्य सरकारकडून आता सिव्हरेज प्लांट उभे केले जात आहेत.. तुम्ही मात्र इतकी वर्ष पर्यावरणाचे खोटे गोडवे गात जनतेची फसवणूक केली. कोट्यावधी रुपये मुंबईच्या सौदर्यकरणावर खर्च केले ते सौदर्य नेमकं गेलं कुठे? असा सवालही उपस्थित केलाय.

जरा डोळे उघडा आणि नीट पहा अलीकडे विकसित झालेल्या नवी मुंबईत भाजपची सत्ता आहे. ती स्वच्छतेबाबत देशात तिसर्‍या क्रमांकावर आहे. तुम्हाला याच्याशी काही घेणे देणेच नाही म्हणा.. तुम्ही फक्त पर्यावरणावर खोट्या गप्पा हाणा, असे भाजपने म्हटले आहे. स्वच्छतेच्या क्रमवारीत मुंबई 31 व्या क्रमांकावर आली म्हणून नाकं मुरडत भाजपवर निर्लज्जपणे खापर फोडत आहात… पण जरा लाज वाटू द्या.. तुमच्या हातात सत्ता असताना तर ४९ व्या क्रमांकावर मुंबई होती, असे भाजपनेही म्हटले आहे.

Tags

follow us