शिवसैनिकांच्या कामाची टक्केवारी खाणारा…; ठाकरेंच्या निकटवर्तीयानेच सुनावले खडे बोल

Amey Ghole On Suraj Chavan ED Raid :  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर ईडीकडून छापेमारी सुरू असल्याचे वृत्त आहे. मुंबईत 10 ठिकाणांवर ईडीकडून ही छापेमारी केली जात असून, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्याशिवाय संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या ठिकाणांवर ही छापेमारी सुरू […]

Letsupp Image   2023 06 21T142417.388

Letsupp Image 2023 06 21T142417.388

Amey Ghole On Suraj Chavan ED Raid :  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर ईडीकडून छापेमारी सुरू असल्याचे वृत्त आहे. मुंबईत 10 ठिकाणांवर ईडीकडून ही छापेमारी केली जात असून, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्याशिवाय संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या ठिकाणांवर ही छापेमारी सुरू आहे. यानंतर आदित्य ठाकरे यांच्या जवळचे मानले जाणारे अमेय घोले यांनी ट्विट केले आहे. अमेय घोले यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केला आहे. अमेय घोले यांनी ट्विट करत या छापेमारीचं समर्थन केले आहे.

गद्दारी करायची असती तर राज ठाकरेसोबत केली असती, गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर हल्लाबोल

ज्या कारकुनाच्या घरी छापा पडला, त्याला बरोबर ठराविक बैठीकीन आधी, Acres Club चेंबूर येथे किती कंत्राटदार भेटायला येत होते आणि ह्याचे त्यांच्याशी नेमके काय संबंध आहेत, ह्याची सुद्धा चौकशी व्हावी, असे घोल म्हणाले. तसेच शिवसैनिकांना मिळालेल्या कामाची टक्केवारी खाणार्‍या ह्या कारकूनावर, जर शिवसेनेसाठी जीव झोकून देणारे निम्म्याहून अधिक विभागप्रमुख, आमदार, नगरसेवक व शिवसैनिक नाराज आहेत, तर ह्यामागची कारणं ही तितकीच गंभीर असावीत, असेही घोले यांनी म्हटले आहे. 

गद्दारी करायची असती तर राज ठाकरेसोबत केली असती, गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर हल्लाबोल

काही दिवसांपूर्वी अमेय घोले यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्याआधी घोलेंनी एक पत्र लिहिले होते. वडाळा विधानसभा मतदारसंघात काम करताना श्रद्धा जाधव आणि सूरज चव्हाण यांनी कामात वारंवार अडथळे आणले. त्यामुळे काम करताना खूप त्रास झाला. याबाबत तुम्हाला वेळोवेळी माहितीदेखील दिली. संघटनेतील मतभेद दूर व्हावे यासाठी मी खूप प्रयत्न केला. मात्र, यावर तोडगा काढण्यात आला नाही. जड अंत:करणानं युवासेना सोडत असून कोषाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले होते. घोले हे आदित्य ठाकरेंच्या अतिशय जवळचे मानले जायचे.

 

Exit mobile version