Download App

ज्या दिवशी आमचं सरकार येईल त्या दिवशी तुमची जागा दाखवणार; आदित्य ठाकरेंचा भाजप- शिंदेंना सज्जड दम

Shiv Sena Rally Mumbai : महापालिकेच्या प्रशासकांना खोके सरकारचा फोन गेला तर उठतात, चालायला लागतात पण तुमचा आवाज त्यांच्यापर्यंत जात नाही. तुमची काळजी त्यांना नसते. याचे कारण म्हणजे तुम्ही नागरिक आहात. तुम्ही मुंबईकर आहात. पण तुम्ही जर बिल्डर म्हणून आलात तर तुमच्या समोर रेड कार्पेट टाकले जाईल. कारण अली बाबा आणि चाळीस लोकांचा फोन येतो. त्या फोनमुळे बिल्डरची कामं करता करता वेळ जातो आणि जनतेची कामं आम्हाला दिसत नाहीत. खोके सरकारमुळे अधिकारी जनतेची काम करु शकत नाहीत, अशी टीका युवा सेना प्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

गेल्या 25 वर्षात आपण केलेल्या कामचे बॅनर सर्वत्र आपण लावले आहेत. आपण केलेली काम जनतेसमोर आणली आणि अभिमानाने सांगतो की होय आम्ही करुन दाखवलं. गेल्या वर्षापासून मुंबई महापालिकेत नगरसेवक नाहीत, कमिट्या नाहीत, चेअरमन नाहीत, महापौर नाहीत, जनतेचे प्रतिनिधी नाहीत, पालिकेच्या दाराला कुलूप लागले आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

ही मुंबई आमच्या बापाची; मोर्चातून राऊत कडाडले

मुंबई महापालिकेच्या वास्तूमधून गेली 100 वर्षे मुंबई चालली आहे. देशाचे अर्थचक्र इथूनच चालते. हे देशातले मोठे शक्तीपीठ आहे. आर्थिक केंद्र आहे. मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा भगवाच झेंडा फडकवायचा आहे आणि त्याचा आवाज दिल्लीला देखील ऐकावा लागतो, असा निर्धार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. मुंबईच्या आजूबाजूला खोके सरकारची भूत फिरत आहेत त्यांना पळवून लावायचे आहे. आपला उत्साह, जोश, आक्रोश पाहिल्यानंतर एकच सांगतो ‘समझने वालो को इशारा काफी है’. आजचं भगवं वादळ हे फक्त मुंबईतले आहे, महाराष्ट्रातले अजून सुरु केले नाही, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.

Tags

follow us