Download App

पालकमंत्र्यांचं कार्यालय आता भाजपच्या नगरसेवकांचंच, आदित्य ठाकरेंची सडकून टीका…

पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचं मुंबई महापालिकेतलं कार्यालय आता भाजपच्या नगरसेवकांचंच झालं असल्याची सडकून टीका ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. दरम्यान, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महापालिकेत कार्यालय थाटलंय. त्या मुद्द्यावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्योरोप सुरु असतानाच आता या कार्यालयात आता भाजपचे नगरसेवक ठाण मांडून बसले आहेत. त्यावरुन राजकारण चांगलंच तापलं असून आदित्य ठाकरेंनी या मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे. विधी मंडळाबाहेरुन त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

मणिपूर घटनेचा राष्ट्रवादीकडून निषेध! काळी फित बांधून केलं ‘मौन निषेध’ आंदोलन…

आदित्य ठाकरे म्हणाले, आता पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचं हे कार्यालय आहे असं मला वाटत नाही, कारण अनेक भाजपच्याच नगरसेवकांचं हे कार्यालय झालं आहे. त्यांना आता BMC चं नाव कॅसा BMC असं ठेवायचं असेल, अशी टीका ठाकरेंनी केली आहे.

तसेच मी देखील मुंबईचा पालकमंत्री होतो पण आम्ही महापौर आणि आयुक्तांच्या दालनामध्ये बैठका घेत असत. कुठेही महापालिकेत पालकमंत्र्यांंचं कार्यालय नाही पण मुंबई महापालिकेत पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचं कार्यालय आहे. त्यामुळे त्यांना महापालिकेत कार्यालय थाटण्याची गरजच नव्हती, असंही ते म्हणाले आहेत.

ज्येष्ठ अभिनेते Dr. Mohan Agashe यांचा ‘पुण्यभूषण’ पुरस्काराने सन्मान! अनुपम खेर पोस्ट करत म्हणाले…

यावेळी बोलताना आदित्य ठाकरेंनी इतरही विविध मुद्यांवर भाष्य करीत सरकारवर निशाणा साधल्याचं दिसून आलं आहे. मणिपूर राज्यात हिंसाचार आणि महिला अत्याचाराच्या अनेक घटना घडत आहेत. मात्र, प्रस्थापित सरकार कोणतीही कारवाई करीत नाहीत, याचं गोष्टीचं आम्हाला दुख: वाटत असल्याचं ते म्हणाले आहेत.

राज्यसभेत मणिपूर घटनेवर कारवाईची मागणी करणाऱ्या खासदारावरच कारवाई होत आहे. त्यामुळ देशात आता लोकशाही नाहीतर हुकूमशाही पद्धत सुरु असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. तसेच विधीमंडळातही विरोधकांचा आवाज दाबला जातोयं, त्यांना बोलू दिलं जात नाही, अशा लोकांना जनताच उत्तर देणार असल्याचं ते म्हणाले आहेत.

राज्य सरकारकडून आता पोलिस भरतीतीही कंत्राटी पद्धतीने करण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.त्यावरुनही आदित्य ठाकरेंनी भाष्य केलं आहे. राज्यात सध्या खोके आणि बिल्डर, कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे, त्यामुळेच पोलिस भरतीही आता कंत्राटी करण्यात येत आहे. हे सगळं काही कोणासाठी होतंय हे आपल्याला लवकरच समजणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

Tags

follow us