Download App

नवाब मालिकांची कन्या अजित पवारांच्या भेटीस, ‘या’ विषयवार झाली चर्चा

मुंबई : मनी लॉन्ड्रींग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून ते ईडीच्या तुरुंगात आहे. मलिक यांनी अनेकदा जामिनासाठी अर्ज केला मात्र अद्याप देखील त्यांना जामीन मिळाला नाही आहे. यातच नवाब मलिक प्रकरण अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील चांगलेच गाजले होते. आता नुकतेच मलिक यांच्या मुलीने विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट घेतली आहे.

समीर वानखेडे प्रकरणामुळे नवाब मलिक हे चांगलेच चर्चेत आले होते. त्यांनतर मनी लॉन्ड्रींग प्रकरणामध्ये ईडीने त्यांच्यावर कारवाई केली. गेल्या वर्षभरापासून त ईडीच्या कोठडीत आहे. या दरम्यान त्यांनी अनेकदा प्रकृतीच्या कारणास्तव जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र अद्यापपर्यंत त्यांना जामीन मंजूर झालेला नाही आहे. किडनीचा त्रास असल्याने मेडिकल ग्राउंडवर बेल मिळावी अशी मागणी त्यानी न्यायालयात केली पण अजूनही मलिक यांना जामीन मिळाला नाही.

नवाब मलिक यांच्या जामिनासाठी गेले अनेक दिवसांपासून मलिक कुटुंबिय हे न्यायालयात संघर्ष करीत आहेत. पण त्यांना अजूनही यश येताना दिसत नाही. दरम्यान आज नवाब मलिक यांच्या मुलीने विधानसभेत अजित पवार यांची भेट घेतली. सद्या न्यायालयात येत असलेल्या अडचणीबद्दल त्यांनी अजित पवारांशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पुण्यात RTO ची दबंगगिरी, विद्यापीठात घुसून वाहनांवर कारवाई

दिलेल्या माहितीनुसार नवाब मलिक यांच्या जवाबची प्रकिया पुर्ण झाली. तोपर्यंत न्यायाधीशांची बदली झाली. गेले दोन तारखेपासून केस बोर्डावर आली पण सुनावणी झाली नाही. कधी न्यायाधीश गैरहजर असल्याने तारीख पे तारीख सुरु असल्यांची माहिती मिळाली. या सर्व अडचणी विषयी अजित पवार यांना माहिती दिल्याचं सूत्रांनी सांगितल.

आधी लुटा मग शिक्षेविनाच सुटका, चोक्सीवरून राहुल गांधींचा भाजपवर निशाणा

पुढील आठवड्यात मलिक यांच्या जामिनावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. या तारखेला तरी मेडिकल ग्राउंड वर निदान जामिन मिळेल अशी आशा मलिक कुटुंबाला लागली आहे. दरम्यान न्यायालय काय निर्णय देणार याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Tags

follow us