Download App

Mohit Kamboj : मोहित कंबोज यांच्यावरील फसवणुकीचे सर्व गुन्हे रद्द, सीबीआयने दिली क्लीन चिट

  • Written By: Last Updated:

Mohit Kamboj : कायम वादाच्या भोवऱ्यात राहणारे भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj)यांना आता सीबीआयने (CBI) मोठा दिलासा दिला. गेल्या काही महिन्यांपासून तपास यंत्रणा मोहित कंबोज यांची चौकशी करत होत्या. मात्र, आज त्यांना सीबीआयकडून क्लीन चीट मिळाली आहे. कंबोज यांच्यावर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे रद्द करण्यात आले आहेत. (All charges of financial fraud against Mohit Kamboj canceled, CBI gives clean chit)

याबाबत अधिक माहिती अशी की, भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल होते. मोहित कंबोज यांना आता सीबीआयने क्लीन चिट दिली आहे. यासोबतच मुंबई उच्च न्यायालयाच्या सीबीआयच्या विशेष अहवालात मोहित कंबोज यांच्यावर कोणताही गुन्हा नसल्याचे म्हटले आहे. मोहित कंबोज यांच्याविरोधात तक्रार करणाऱ्या संबंधित बँकरनेही ना हरकत अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे मोहित कंबोज यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सीबीआयकडून क्लीन चीट मिळाल्यानंतर कंबोज यांनी एक ट्विट केलं. त्यात सत्यमेव जयते असं म्हटलं.

कोण आहेत मोहित कंबोज?

मोहित कंबोज वर्षभरापूर्वी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला कॉर्डेलिया क्रुझ ड्रग प्रकरणी अटक झाल्यानंतर चर्चेत आले होते. ते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणूनही ओळखले जातात. तसेच काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोहित कंबोज रात्री साडेतीन वाजता बारमध्ये मुलींसोबत डान्स करत होता, असा दावा केला होता. तेव्हाही कंबोज चांगलेच चर्चेत आले होते.

कंबोज यांच्यावर कोणते गुन्हे?
मोहित कंबोज हे अनेकदा वादात सापडले आहेत. काही महिन्यांपूर्वी इंडियन ओव्हरसीज बँकेच्या व्यवस्थापनाने त्यांच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. कबोज यांनी घेतलेलं 52 कोटी रुपयांचं कर्ज ज्या कारणासाठी घेतलं होतं, त्याऐवजी अन्यत्र वळवण्यात आलं. नंतरच्या काळात कंबोज यांनी हे कर्ज बुडवले. बॅंकेच्या या तक्रारीच्या आधारे आर्थिक गुन्हे शाखेने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तर 2019 मध्ये, बँक ऑफ बडोदाने कंबोज यांना डिफॉल्टर म्हणून घोषित केलं होतं. त्यांनी ‘अवयान ज्वेलरी’ कंपनीच्या नावाने कर्ज घेतले होते. सीबीआयने 2020 मध्ये ‘अवयान ओव्हरसीज’च्या नावाने घेतलेल्या कर्जासंदर्भात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, आता त्यांनी सीबीआयने क्लिन चीट दिली आहे.

Tags

follow us