सलमान खानच्या बहिणीच्या घरी मारला डल्ला; जवळचा व्यक्तीच निघाला चोर

Arpita Khan House Robbery : अभिनेता सलमान खानची बहिण अर्पिता खानच्या घरी चोरी झाली झाली आहे. पाच लाख रुपये किंमत असलेली हिऱ्याची कानातील रिंग चोरीला गेली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी तपास करून एका व्यक्तीला अटक केली आहे. Neha Dhupia : नेहा धुपिया होती लग्ना आधीच प्रेग्नेंट, खुलासा करत अभिनेत्री म्हणाली… चोरी […]

Aprpita And Salman

Aprpita And Salman

Arpita Khan House Robbery : अभिनेता सलमान खानची बहिण अर्पिता खानच्या घरी चोरी झाली झाली आहे. पाच लाख रुपये किंमत असलेली हिऱ्याची कानातील रिंग चोरीला गेली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी तपास करून एका व्यक्तीला अटक केली आहे.

Neha Dhupia : नेहा धुपिया होती लग्ना आधीच प्रेग्नेंट, खुलासा करत अभिनेत्री म्हणाली…

चोरी करणाऱ्या व्यक्ती हा घरातील नोकर आहे. संदीप हेगडे त्याचे नाव आहे. तो मुंबतील विलेपार्ले भागात राहतो, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. संदीप हा अर्पिताच्या घरी हाऊस किपिंगचे काम करत होता. या आरोपीकडून आता चोरीला गेलेली रिंग पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु आहे.

पाच लाख किमतीची ही रिंग होती. तिने हे रिंग तिच्या मेकअपच्या ट्रेमध्ये ठेवले होती. ही रिंग सापडली नाही. या घटनेप्रकरणी अर्पिताने खार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार एक दिवसांपूर्वी 16 मे रोजी ही घटना घडली होती.

त्यानुसार पोलिसांनी पथकाची स्थापन करून आरोपीचा शोध सुरू केला होता. घरातील व्यक्तीने ही चोरी केल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानुसार पोलिसांनी हाउसकिपिंगचे काम करणाऱ्या संदीप हेगडेला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडे चोरी केलेली रिंगही आढळून आलेली आहे. संदीप हेगडेला पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे.

Exit mobile version