Download App

प्रवास होणार वेगवान… अटल सेतूवरून प्रवास करण्यासाठी कोणत्या वाहनाला किती टोल?

  • Written By: Last Updated:

Atal Setu Bridge Toll : मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहरांमधील अंतर कमी करण्यासाठी सागरी सेतू बांधण्याची संकल्पना अनेक वर्षांपूर्वी मांडण्यात आली होती. अखेर आज ती प्रत्यक्षात आली आहे. अटल शिवडी-न्हावाशेवा पुलाचे (Atal Shivdi-Nhavasheva bridge) आज उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन झालं आहे. या पुलाच्या बांधकामासाठी 17,840 कोटी रुपये खर्च आला आहे.

Baipan Bhari Deva: जगप्रसिद्ध ‘फोर्ब्स’ मासिकात झळकले दिग्दर्शक साई-पियूष अन् केदार शिंदे 

पंतप्रधान मोदींच्या हस्ते शिवडी-न्हावाशेवा पुलाचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे आता मुंबईच्या शिवडीतून सुरू होणारा प्रवास न्हावा शेवापर्यंत सुसाट होणार आहे. हा 21.8 किमीचा मार्ग देशातील सर्वात लांब सागरी मार्ग बनला आहे. या पुलामुळे मुंबईच्या वाहतुकीत लक्षणीय बदल होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, या पुलावरून प्रवास करण्यासाठी वाहनांच्या प्रकारानुसार टोल भरावा लागतो. एकेरी टोल किमान 250 रुपये ते कमाल 1580 रुपये भरावा लागेल. मासिक पासची सुविधाही येथे उपलब्ध असेल. टोल पाससाठी 12500 ते 79000 रुपये मोजावे लागतील.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतू सुरू झाल्यामुळे मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील अंतर दोन तासांवरून 20 मिनिटांवर आले आहे. शिवडीहून न्हावा शेवा अवघ्या काही मिनीटात गाठणं सुलभ होणार असल्यानं प्रवाशांना दिलासा मिळाला. शिवाय, मालवाहूकही जलद होणार असल्यानं उद्योग आणि व्यापाऱ्यांनाही फायदा होणार आहे.

Salman Khan: ‘टाइगर 3’ स्ट्रीमिंगवर फिल्म हिट होताच, अभिनेत्याने थेट सांगितलं, म्हणाला… 

अटल पुलावर वाहन निहाय टोल

कार
एका बाजूने – 250 रुपये
दोन्ही बाजू – 375 रुपये
एकदिवशीय पास -625 रुपये

मासिक पास-12500 रुपये

मिनी बस

एका बाजूने 400 रुपये
दोन्ही बाजूंनी 600 रुपये
एक दिवसाचा पास – 100 रु

मासिक पास – 20000 रुपये

बस/ट्रक (2 अॅक्सल)

एका बाजने – 830

दोन्ही बाजूने – 1245
ODI पास – 2075

मासिक पास-41500

ट्रक ( 3 अॅक्सल)
एका बाजूने – 905
दोन्ही बाजूने – 1360
एक दिवसाचा पास – 2265
मासिक पास – 45250

ट्रक (4-6 एक्सल)
एका बाजूने – 1300
दोन्ही बाजूने – 1950
ODI पास – 3250
मासिक पास – 65000

ओव्हर साईज कंटेनर

एका बाजूने – 1580

दोन्ही बाजूने – 2370

एक दिवसाचा पास – 3950 रु

मासिक पास – 79000

आयफेल टॉवरपेक्षा जास्त स्टील

आयफेल टॉवरच्या तुलनेत या पुलामध्ये वापरण्यात आलेले स्टील 17 पट जास्त आहे. तसेच, वापरलेले स्ट्रक्चरल स्टील हावडा ब्रिजच्या तुलनेत चौपट जास्त आहे. त्यात वापरलेले काँक्रीट स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या तुलनेत सहापट जास्त आहे. त्याची वायरिंगही मोठी आहे.

follow us