Accident: मुंबईची गर्दी जीवावर बेतली; धावत्या लोकलमधून पडल्याने 20 वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

डोंबिवलीमधील अनेक प्रवाशांना लोकलमधील गर्दीमुळे आपला जीव गमवावा लागत आहे. दोन तीन महिन्याभरापूर्वी दुबे नावाचा डोंबिवली

Accident: मुंबई लोकलची गर्दी जीवावर बेतली; धावत्या लोकलमधून पडल्याने 20 वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Accident: मुंबई लोकलची गर्दी जीवावर बेतली; धावत्या लोकलमधून पडल्याने 20 वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Mumbai Local Accident : मुंबई लोकलमधील गर्दीमुळे धावत्या लोकलमधून (Mumbai Local ) पडून डोंबिवलीतील एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. (Accident) सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली असून, आयुष दोषी असं मृत तरुणाचं नाव आहे.

डोंबिवली पश्चिमेतील ठाकूरवाडी परिसरातील मधुकुंज इमारतीमध्ये राहणारा 20 वर्षांचा आयुष मुलुंडमधील एका कॉलेजमध्ये डिप्लोमा करत होता. नेहमीप्रमाणे आयुष डोंबिवली रेल्वे स्थानकात पोहोचला. मुंबईकडे जाणारी 8.15 ची लोकल पकडली. डोंबिवली आणि कोपरदरम्यान तो लोकलमधून पडला आणि गंभीर जखमी झाला. जखमी आयुषला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, त्याआधीच आयुषचा दुर्दैवी मृत्यू झाला.

VIDEO : निवडणूक आयुक्तांचं EVM बाबत मोठं विधान म्हणाले, ईव्हीएमध्ये कोणतीही..

डोंबिवलीमधील अनेक प्रवाशांना लोकलमधील गर्दीमुळे आपला जीव गमवावा लागत आहे. दोन तीन महिन्याभरापूर्वी दुबे नावाचा डोंबिवली मधील रहिवाशी याचा लोकलमधून पडून मृत्यू झाला होता. आता आयुषच्या मृत्यूनंतर डोंबिवलीकरांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे.

रेल्वे प्रवासी संघटनाकडून रेल्वे गाड्या वाढवण्याची मागणी सातत्याने होत आहे. अपघात थांबवण्यासाठी रेल्वेने त्वरित उपाययोजना केली पाहिजे, अशी मागणी होत आहे. परंतु रेल्वेकडून अजून यासंदर्भात ठोस पाऊल उचलले जात नाही, त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे. रेल्वे प्रशासनाच्या आकडेवारी नुसार, जानेवारी महिन्यात 171, फेब्रुवारी महिन्यात 152, मार्च महिन्यात 165, एप्रिल महिन्यात 179, मे महिन्यात 182, जून महिन्यात 135 तर जुलै महिन्यात 177 प्रवाशांनी जीव गमावला आहे.

Exit mobile version