Download App

Balasaheb Thorat यांनी राजीनामा दिला का ? नाना पटोले यांची पहिली प्रतिक्रिया

  • Written By: Last Updated:

मुंबई : कॉंग्रेसमधील वाद आता विकोपाला गेला आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. पण, गेल्या काही दिवसांपासून ते माझ्या संपर्कात नाही, त्यांच्याशी काही बोलणं देखील झालं नाही. त्यांनी राजीनामा दिला की नाही, याबद्दल मी काही सांगू शकत नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली.

ऐन कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातला वाद विकोपाला गेल्याने बाळासाहेब थोरात यांनी गटनेतेपदाचा राजीनामाच दिला. प्रभारी एच के पाटील आणि अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना दिलेल्या पत्रात राजीनामा दिल्याचा उल्लेख केला आहे.

मात्र, बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस आहे, त्यांना वाढिवसाच्या शुभेच्छा देत असून राजकीय उत्कर्ष व्हावा, त्यांनी राजीनामा दिलेला नाही. आम्ही आज कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. विधान परिषद निवडणुकीत यश मिळवलेल्या आमदारांचा सत्कार आयोजित केला. 15 तारखेला बैठक ठेवली आहे, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

आमच्या काँग्रेसमध्ये काय झालं, याची चर्चा जास्त होते. पण भाजपात काय चाललं आहे, याविषयी कुणी काही बोलत नाही. आम्ही लोकशाहीला मानणारे लोक आहोत. पण जी लोक लोकशाहीला मानत नाही, त्यांच्याविषयी विचारा. बाळासाहेब थोरात हे आमच्याशी काही बोलतच नाही. ते आमच्या संपर्कात नाही, असंही नाना पटोले यावेळी म्हणाले.

Tags

follow us