गणेश नाईकांकडून शिंदेंचा टांगा पलटी! नवी मुंबईतील विजयानंतर पोस्टरमधून शिंदेंना डिवचलं

Ganesh Naik Shivsena Shinde भाजपकडून नवी मुंबईमध्ये पोस्टरबाजीतून शिवसेनेला डिवचण्यात आलं. त्यामध्ये शिंदेंचे व्यंगचित्र बनवण्यात आलं आहे.

Ganesh Naik Shivsena Shinde

Ganesh Naik Shivsena Shinde

BJP and Ganesh Naik defeat to Shivsena Shinde teased by bjp poster after victory in Navi Mumbai : राज्यामध्ये आज 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यामध्ये अनेक महानगरपालिकांमध्ये प्रतिष्ठेची लढाई होती. त्यामधील एक महानगरपालिका होती ती म्हणजे नवी मुंबई महानगरपालिका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे मंत्री गणेश नाईक यांच्यात याठिकाणी थेट सामना होता. कारण त्यांचे वाद याठिकाणी टोकाला गेलेले होते.

पिंपरी चिंचवड महापालिकेत अजित दादांना धक्का; 85 जागा जिंकत भाजपने बहुमताचा टप्पा ओलांडला

या ठिकाणी भाजपने 72 जागावर आघाडी घेतली असून शिंदे यांची शिवसेना 28 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे गणेश नाईकांनी या ठिकाणी केलेल्या त्यांच्या भाषणात म्हटल्याप्रमाणे त्यांनी शिंदेचा टांगा पलटी केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान विजयानंतर भाजपकडून नवी मुंबईमध्ये पोस्टरबाजी करत शिवसेनेला डिवचण्यात आलं आहे. त्या बॅनरमध्ये एकनाथ शिंदे यांचे व्यंगचित्र बनवण्यात आलं आहे. ज्यामध्ये शिंदे हे पलटी होत असलेला टांगा सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.

मुंबईत अनेक नेत्यांच्या कुटुंबीयांना पराभवाचा धक्का; कोणाकोणाच्या नातेवाईकांना करावा लागला पराभवाचा सामना?

ठाणे, कल्याण-डोंबिवली महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती झाली होती. पण जवळच्या नवी मुंबईमध्ये भाजप-शिवसेनेमध्ये जोरदार संघर्ष होत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्या रणनितीमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेना जेरीस आल्या सारखी परिस्थिती होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे कात्रीत सापडलेले होते. वनमंत्री गणेश नाईकांनी थेट एकनाथ शिंदेंवर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांना शिंगावर घेतलं होतं. त्यामुळे येथे भाजप आणि शिवसेनेची प्रतिष्ठापणाला लागली होती.

Exit mobile version