मुंबई : ‘मी विधीमंडळाचा (Budget session) अपमान केला नाही. एका विशिष्ट गटापुरते माझे विधान मर्यादित आहे. त्या गटासंदर्भात मी केलेलं वक्तव्य योग्य आहे, असे म्हणत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्या वक्तव्यावर ठाम असल्याचे सांगितले.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूर (Kolhapur) येथील एका सभेत शिंदे गटाच्या आमदारांना ‘चोरमंडळ’ असे म्हटले होते. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात गदारोळ केला होता. त्यानंतर संजय राऊत यांच्यावर भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांनी हक्कभंग दाखल केला होता.
यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या सभापती निलम गोऱ्हे यांनी हा प्रस्ताव दाखल करीत नोटीस पाठवली होती. त्या नोटीसीला उत्तर दिले की नाही यांची माहिती संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Ajit Pawar : सरकारची धुळवड झाली असेल तर शेतकऱ्यांना मदत करावी
संजय राऊत म्हणाले, हक्कभंगासंदर्भात संसद, विधीमंडळाची एक प्रक्रिया असते. जेव्हा मला हक्कभंगाची नोटीस मिळाली तेव्हा मी मुंबईत नव्हतो. त्यामुळे मी उत्तर देऊ शकलो नाही. विधीमंडळाला देखील दोन दिवस सुट्ट्या होत्या. आज विधीमंडळ सुरु झाले आहे. आमच्या विधीमंडळातील सहकाऱ्यांची चर्चा करीन आणि त्यांची काय प्रोसेस आहे ते पाहून नक्कीच उत्तर दिले जाईल, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
संजय राऊत म्हणाले, मी विधीमंडळाचा अपमान केला नाही. एका विशिष्ट गटापुरते माझे विधान मर्यादित आहे. त्या गटासंदर्भात मी केलेलं वक्तव्य योग्य आहे. हे मीच म्हणत नाही तर संपूर्ण महाराष्ट्र म्हणतोय, असे म्हणत संजय राऊत यांनी चोरमंडळ या शब्दावर ठाम असल्याचे सांगितले.