Download App

CM शिंदेंच्याच बालेकिल्ल्यावर भाजपचा दावा; ठाणे जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांना मिळाला कानमंत्र

Thane Lok Sabha constituency :

मुंबई : कल्याण लोकसभा मतदारसंघातील राजकीय कुरघोड्यांमुळे आधीच तणावपूर्ण बनलेलं भाजप-शिवसेनेतील वातावरण आणखी बिघण्याची शक्यता आहे. भाजपने (BJP) कल्याण पाठोपाठ थेट आता थेट ठाणे (Thane) लोकसभा मतदारसंघावरच दावा ठोकला आहे. ठाणे जिल्हा हा पूर्वीपासून भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे, हे दाखवण्यासाठी सर्वानी सिद्ध व्हा. कार्यकर्त्यांनी बूथवरील लढाई लढल्यास भाजपसाठी ठाणे लोकसभा जिंकणे कठीण नाही, असा कानमंत्र देत मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यामार्फत भाजपने ठाणे लोकसभेसाठी तयारी सुरु केली आहे. (BJP claim on Thane Lok Sabha constituency There is a possibility of dispute with Shiv Sena)

काय म्हणाले रविंद्र चव्हाण?

‘नरेंद्र मोदी यांना आपल्याला पुन्हा एकदा पंतप्रधान बनवायचे आहे. याशिवाय या वेळी लोकसभेत आपल्याला 400 पारचे लक्ष्य गाठायचे आहे. आणि यासाठी ठाणे लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक बूथवर भाजप किंवा एनडीएच्या उमेदवाराला 51 टक्के मते मिळवण्याचे लक्ष्य ठेवून भाजपच्या कार्यकर्त्यांनी एका बूथची मालकी घेऊन बूथवरील लढाई लढावी,’ असे आवाहन चव्हाण यांनी केले. 2024 ची लोकसभा निवडणूक ही भाजपच्या अस्तित्वाची लढाई आहे. कार्यकर्ता कमजोर होऊ देऊ नका, असा कानमंत्रही चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिला.

‘भाकरी फिरली नाही, धूळफेक केली’; पवारांच्या निर्णयावर फडणवीसांचे एकाच वाक्यात उत्तर

कल्याणवरुन तापलं आहे वातावरण :

शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या कल्याण लोकसभा मतदारसंघावरुन बिनसलं आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा तर केलाच आहे. याशिवाय या मतदारसंघात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे 2 दौरेही झाले आहेत. तसंच आता एका पोलीस निरीक्षकाच्या बदलीची मागणी करत, जोपर्यंत ही बदली होणार नाही तोपर्यंत कल्याणमध्ये शिवसेनेचे आणि शिंदेंचे कोणतेही काम करणार नाही, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. या वादातून कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी राजीनामा देण्याचीही तयारी दर्शविली आहे.

कृषी विभागाच्या कथित धाडी प्रकरणी अब्दुल सत्तारांचा पाय खोलात जाणार?

काय आहे वाद ?

कल्याण लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने नुकतीच भाजपची आढावा बैठक पार पडली. यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या 9 वर्षे पूर्तीनिमित्ताने अभिनंदन ठराव मांडला. याला उपस्थित शेकडो पदाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली. त्यानंतर भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले यांनी जोपर्यंत पोलीस निरीक्षक शेखर बगाडे यांची बदली होत नाही तोपर्यंत शिवसेनेचे काम न करणे, कार्यक्रमात सहभागी न होणे असा प्रस्ताव मांडला. या उपस्थित सर्वानुमते अनुमोदन देण्यात आले आणि ठराव पारित करण्यात आला. रवींद्र चव्हाण यांनी देखील असा ठराव होणे म्हणजे फार गंभीर असल्याचे सांगत आपण कार्यकर्त्यांच्या भावना जपणार असल्याचे सांगितले होते.

Tags

follow us