भुजबळ, मुश्रीफ मंत्री झाल्यावर सोमय्या पहिल्यांदा माध्यमांसमोर; म्हणाले, मी माझं…

BJP Leader Kirit Somayya : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांची गोची झाली. याचे कारण विरोधी पक्षात असताना भाजपच्या अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना ईडीचा सामना करावा लागला. हे आरोप करणाऱ्यांमध्ये प्रमुख नाव भाजपचे […]

Letsupp Image   2023 07 11T173458.860

Letsupp Image 2023 07 11T173458.860

BJP Leader Kirit Somayya : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांची गोची झाली. याचे कारण विरोधी पक्षात असताना भाजपच्या अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना ईडीचा सामना करावा लागला.

हे आरोप करणाऱ्यांमध्ये प्रमुख नाव भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचे होते. त्यांच्या आरोपांनंतर छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने धाड टाकल्या होत्या. पण आता हीच नेतेमंडळी भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी झाल्याने सोमय्यांची गोची झाल्याचे बोलले जात होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या शपथविधीनंतर सोमय्या माध्यमांसमोर आले नव्हते. आज अखेर सोमय्यांनी माध्यमांसमोर येत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

12 आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा; पंकजा मुंडे, रामदास कदम, हर्षवर्धन पाटलांचा वनवास संपणार?

सोमय्या म्हणाले, “मी माझं कर्तव्य पार पाडलेलं आहे. शेवटी आता पक्षाचा निर्णय असतो. पक्षाचं विशिष्ट पद्धतीने काम करण्याचं तंत्र असतं. यांच्यावर अनेक ठिकाणी न्यायालयीन कारवाई ही सुरू झालेली आहे. या गोष्टी न्यायालयात आहेत.न्यायालयात खटले सुरू असताना त्यावर बोलणं योग्य ठरणार नाही.”

15 दिवसांत ‘ते’ लोकं साहेबांकडे फिरणार, आमदार रोहित पवारांचं मोठं विधान…

यावेळी सोमय्या मुंबईमध्ये माहिम रेल्वे स्थानक या ठिकाणी १७ वर्षांपूर्वी घडलेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजलीपर कार्यक्रमात आले होते. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.  दरम्यान, नागपूर येथे झालेल्या कालच्या सभेत उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविषयी बोलताना नागपूरला लागलेला कलंक असा शब्द वापरला होता. त्यावर वास्तविक उद्धव ठाकरे ही व्यक्ती कलंक आहे. ठाकरेंनी हिंदुत्वाच्या विचारांना तिलांजली दिली आहे, खरं हाच एक मोठा कलंक आहे, असे म्हणत सोमय्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.

Exit mobile version