Download App

Nitesh Rane : ‘उद्धव ठाकरेंनीच काढली राणे साहेबांची खुर्ची’; नितेश राणेंनी ‘इतिहास’च सांगितला

Nitesh Rane : ठाण्यातील टेंभी नाका येथील देवीच्या दर्शनासाठी रश्मी ठाकरे गेल्यानंतर तेथील कुलर आणि पंखे बंद पडले होते.  या प्रकारावरून ठाकरे गटाच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली होती.  आज सकाळी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही पत्रकार परिषदेत हा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकावर घणाघाती टीका केली. एका महिलेला घाबरले असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. त्यांच्या या टीकेला भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी जोरदार प्रत्युत्तर देत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) शिवसेनेत असताना त्यांच्याबाबत घडलेल्या एका प्रसंगाची आठवण करून दिली.

राणे म्हणााले, काल रश्मी ठाकरे टेंभीनाक्यावर देवीच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. त्यावेळी तेथील पंखे आणि कुलर बंद केल्याचे आम्ही ऐकले. त्यावर चीडाचीड झाली. एका महिलेला घाबरले असे संजय राऊत आज सकाळी बोलताना आम्ही ऐकलं. पण, मी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतला आठवण करून देतो की, सन 2004 मध्ये रंगशारदा सभागृहात जेव्हा शिवसेनेचा मेळावा झाला होता. बाळासाहेब ठाकरे सुद्धा या मेळाव्याला उपस्थित राहणार होते. त्यावेळी स्टेजवर राणे साहेब बसू नयेत म्हणून राणे साहेबांची खुर्चीच काढून टाकण्याचे आदेश याच उद्धव ठाकरेंनी दिले होते.

एक भेट-चर्चा अनेक! राहुल नार्वेकर आणि CM शिंदेंची ‘वर्षा’वर बंद दाराआड खलबतं

असाच प्रकार यांनी राज ठाकरेंच्याबाबतीतही केला होता. स्टेजवर नेत्यांच्या बाजूला असलेली राज ठाकरेंची खुर्ची काढून टाकायची. जेणेकरून ते स्टेजवरच बसणार नाहीत. आज जेव्हा उद्धव ठाकरेंच्या घरातील व्यक्ती जिथे उपस्थित होत्या तेथील कुलर बंद झाला तर त्याला नियतीचा खेळ म्हणतात. नियती प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने उत्तर देतच असते. तोच प्रकार काल ठाण्यात घडला. आज जे कुलर बंद केला म्हणून जळफळाट करत आहेत त्यांनी तेव्हाच्या शिवसैनिकांना विचारावं की त्यावेळी राज ठाकरे आणि नारायण राणे यांना उद्धव ठाकरे घाबरले होते का? असा सवाल राणे यांनी विचारला.

1993 मध्ये मुंबईत काय घडलं ते पवार साहेबांनीही पाहिलं 

1993 च्या दंगलीत काय घडलं हे पवार साहेबांनी स्वतः अनुभवलं आहे. तरीही फक्त मतांच्या राजकारणासाठी पंतप्रधान मोदींवर ते टीका करत आहेत. इंडियाच्या कोणत्याही नेत्याला आम्ही हमासचा निषेध करताना पाहिलेलं नाही. दहशतवाद्यांचा निषेध करताना आम्ही त्यांना ऐकलेलं नाही. म्हणजे मतांच्या राजकारणासाठी किती लाचार व्हायचं याला मर्यादाच राहिलेली नाही. देशात जे लोक हमासचे समर्थन करत आहेत त्याला हे इंडियाचे लोक अप्रत्यक्षपणे समर्थन देत असल्याचा आरोप राणे यांनी केला.  समाजवाद्यांना प्रवचन देणारे उद्धव ठाकरे उद्या हमासच्या समर्थनार्थ निघालेल्या रॅलीत मतांच्या राजकारणासाठी उभे राहिलेले दिसले तर आश्चर्य वाटायला नको. त्यामुळे आज जे पंतप्रधानांवर टीका करत आहेत त्यांनी दुसऱ्याला सल्ले देऊ नये. तुम्ही अप्रत्यक्षपणे देशविरोधी शक्ती आणि दहशतवाद्यांना मदत करताये हे विसरू नका, असेही राणे म्हणाले.

“मग सुप्रियाताईंना हमासकडून लढण्यासाठी का पाठवत नाही?” : भाजप नेत्याचा पवारांना खोचक सवाल

Tags

follow us