Bombay Dyeing Land deal : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत मालमत्ता विक्रीचे अनेक किस्से आपण ऐकतो. मुकेश अंबानींच्या आलिशान घरापासून ते मोठमोठ्या कार्यालयांचे करोडोंचे सौदे थक्क करणारे असतात. अशीच एक बडी डील वरळी परिसरात झाली. वाडिया ग्रुपची कंपनी बॉम्बे डाईंगच्या जमीनीचा (Bombay Dyeing Land) व्यवहार तब्बल 5200 कोटींना झाल्याची माहिती आहे.
दक्षिण मुंबईतील वरळी येथील पांडुरंग बुधकर मार्गावर बॉम्बे डाईंग मिलची 22 एकर जागा आहे. बॉम्बे डाईंगच्या संचालकांची बुधवारी एक मिटींग झाली. या मिटींगमध्ये जमीन विक्रीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली होती. त्यानंतर ही जमीन विकण्यात आली. बॉम्बे डाईंगने आपली 22 एकर जमीन गोईसू रियल्टी या कंपनीला विकली आहे. ही कंपनी जपानच्या रियल्टी डेव्हलपर सुमितोमोची उपकंपनी आहे.
काश्मीरमध्ये यंदा घुमणार ‘गणपती बाप्पा मोरयाsss’चा आवाज; पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांचा पुढाकार
बॉम्बे डाईंगने ही जमीन सुमितोमोला पाच-दहा लाखांत विकली नसून तब्बल 5200 कोटींना विकली आहे. किमतीच्या दृष्टीने मुंबईतील हा सर्वात मोठा जमीन व्यवहार आहे. सुमितोमोसोबतचा जमिनीचा व्यवहार हा 2 टप्प्यात पूर्ण होईल. कंपनीला पहिल्या टप्प्यात 4675 कोटी रुपये मिळाले आहेत. तर कंपनीला उर्वरित 525 कोटी रुपये दुसऱ्या टप्प्यात मिळणार आहेत.
गोइसू रियल्टीने यापूर्वी 2019 मध्ये, कंपनीने वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये MMRDA कडून 12,141 चौरस फूट जागा भाडेतत्त्वावर घेतली होती. यासाठी कंपनीने 2238 कोटी रुपये उभे केले आहेत.