Download App

दोन लाख द्या, मुंबई, पुण्यातील बॉम्बस्फोट थांबवतो; धमकीच्या फोननं खळबळ

  • Written By: Last Updated:

Bomb Blast Threat Call To Mumbai Police : गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांना विविध प्रकारच्या धमक्यांचे फोन येत असून, अशाच एका धमकीच्या फोननं पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. यावेळी मुंबई पोलिसांना आलेल्या फोनमध्ये मुंबई आणि पुण्यात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली आहे. यानंतर पोलीस सतर्क झाले असून, धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. विशेष म्हणजे धमकी देणाऱ्या व्यक्तीने आपल्याला दोन लाख दिल्यास मुंबई पुण्यात होणारे बॉम्बस्फोट थांबवू शकतो असेदेखील म्हटले आहे. याबाबत एबीपी माझाने वृत्त दिले आहे.

Video : PM मोदींच्या भाषणावेळी 15 वेळा उभे राहिले खासदार, 79 वेळा झाला टाळ्यांचा कडकडाट

याबाबत अधिक माहिती अशी की, धमकी देणाऱ्या व्यक्तीने फोनवर मुंबई आणि पुण्यात बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली असून, अंधेरी आणि कुर्ला परिसरात 26 जूनच्या संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास हे स्फोट घडवून आणण्याचा उल्लेख कॉलरने केला आहे.

याशिवाय या फोनमध्ये कॉलरने अनेक दावे करत इतरही माहिती दिली आहे. ज्यात त्याने आपल्याला दोन लाख रुपयांची गरज असून, ही रक्कम आपल्याला मिळाल्यास घडणारे हे स्फोट आपण थांबवू शकतो. याशिवाय पुण्यात जे स्फोट घडणार आहेत ते आपण स्वतः करणार असून, यासाठी आपल्याला दोन कोटी मिळणार असल्याचा दावा या व्यक्तीने केला आहे. परंतु, आपल्याला गरज असलेली दोन लाखांची रक्कम मिळाल्यास आपण एका व्यक्तीसोबत मलेशियाला रवाना होऊ शकेल असेदेखील फोन करणाऱ्या व्यक्तीने म्हटले आहे.

धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक

पोलीस तपासादरम्यान कॉलरनं हा फोन उत्तर प्रदेशातील जौनपूर येथून केल्याचं तपासात समोर आलं आहे. आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली असून, याप्रकरणी अंबोली पोलिसांनी आयपीसीच्या कलम 505 (1) (बी), 505 (2) आणि 185 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

मोदी देश चालवतात, साडेतीन जिल्हे नाही : आमदार बोर्डीकरांचा रोहित पवारांना टोला

दरम्यान, धमकीचा फोननंतर या प्रकरणी पोलिसात अज्ञाताविरोधत गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्राथमिक माहितीनुसार हा फोन उत्तर प्रदेशातून आल्याचे सांगितले जात आहे. या आधीदेखील मुंबई पोलिस कंट्रोल रूमला अनेक धमक्यांचे फोन आले होते. मात्र, तपासात धमकी देणाऱ्या व्यक्ती मानसिक आजारी असल्याचे समोर आले होते. त्यामुळे हा फोन देखील कुण्या मानसिक आजारी व्यक्तीने केला आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.

Tags

follow us