Download App

सर्वांना चांगली खाती मिळतीलच असं नाही; NCP च्या खातेवाटपावर उदय सामंतांचे मोठे विधान

Maharashtra cabinet expansion : मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल. मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी होणार होता झाला नाही. मंगळवारी होणार होता झाला नाही. आता बुधवार किंवा गुरुवारची वाट बघू. पण मंत्रिमंडळ विस्तार लवकरात लवकर होईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

ते पुढं म्हणाले की छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना त्यांच्या अनुभवानुसार चांगली खाती मिळायला हवीत. तशी त्यांनी मागणी करणेही रास्त आहे. पण त्यांना चांगली खाती मिळतीलच असे नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे खाते वाटपाचा योग्य निर्णय घेतील, असे उदय सामंत यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण माहित आहे. ते प्रत्येक जागेनुसार योग्य निर्णय घेतील. विकासासाठी पालकमंत्री महत्वाचा असतो. याबाबत योग्य निर्णय हे तिन्ही प्रमुख नेते घेतील. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे याआधी महत्वाची खाती होती. त्यांना आता महत्वाची खाली मिळायला हवीत. तशी त्यांनी मागणी करणे योग्य आहे. पण त्यांना महत्वाची खाती मिळतीलच असे नाही. आमच्यामध्ये कोणताच वाद नाही. आमचे तिन्ही नेते समन्वयाने यातून मार्ग काढतील, असे उदय सामंत यांनी सांगितले.

शिवसेना-राष्ट्रवादीच्या फुटीचा काँग्रेस डाव साधणार; अशोक चव्हाणांनी मनसुबे सांगितले

अजित पवार सोबत आल्याने आता शिवसेना आणि भाजपची थोडी थोडी खाती कमी होणार हे स्वभाविकच आहे. कारण तिसरा पक्ष सोबत आल्याने शिवसेना, भाजपला तडजोड करावीच लागणार आहे. आमचे महामंडळाचे वाटप तयार होते. पण अजितदादा आल्याने आता नव्याने आखणी करावी लागणार आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले.

Tags

follow us