Download App

Tax refund : दिवाळीपूर्वीच केंद्राचे राज्यांना गिफ्ट, महाराष्ट्राला मिळाले ‘इतके’ कोटी

  • Written By: Last Updated:

Tax refund : देशात दिवाळीचा उत्साह सर्वत्र दिसून येत आहे. बाजारपेठेतही व्यवसायिकांची आणि ग्राहकांची लगबग दिसून येत आहे. बाजारपेठाही फुलून गेल्या आहेत. त्यामुळे सगळीकडे दिवळीचे वातावरण बनले आहे. या सणासुदीच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नोव्हेंबर 2023 या महिन्यासाठी राज्य सरकारांना जीएसटी टॅक्सच्या रकमेचं वाटप केलं आहे. केंद्र सरकारने 28 राज्यांची यादी जाहीर केली आहे. या सर्व राज्यांना मिळून तब्बल 72961.21 कोटींचे कर वाटप केले आहे.

केंद्र सरकारकडून राज्यांना प्रत्येक महिन्यात त्यांच्या कराचा हिस्सा म्हणून टॅक्स वाटप केले जाते. ते महिन्यांच्या 10 तारखेला करण्यात येते. मात्र यंदा दिवाळीचा सण असल्याने तीन दिवस अगोदरच हे पैसे वाटप केले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र सरकारला 4609 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश सरकारला सर्वाधिक 13,088 कोटींचे वाटप झाले आहे. तर गोव्याला सर्वात कमी म्हणजे 281 कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. उत्तर प्रदेशनंतर बिहारला 7338 कोटी रुपयांचा फंड रिलीज झाला आहे. त्यानंतर मध्ये प्रदेश 5727 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. तर मध्ये प्रदेशनंतर प. बंगाल 5488 कोटी आणि त्यानंतर महाराष्ट्राला सर्वाधिक 4609 कोटी रुपये मिळाले आहेत.

Dhangar Reservation : धनगर आरक्षणाला पुन्हा समिती? कॅबिनेटमध्ये होणार मोठा निर्णय

राज्य सरकारांना आर्थिक गणित जुळवण्यासाठी केंद्राकडून मिळालेल्या या कररुपी निधीची मदत होईल. तसेच जनतेतील सण आणि उत्सवांमध्येही या वाटपाचा मोठा हातभार लागणार आहे. दरम्यान केंद्र सरकारने एक तक्ता जारी केला असून त्यामध्ये कोणत्या राज्याला किती रक्कम मिळाली याची माहिती दिली आहे.

Tags

follow us