शिंदे-फडणवीसांसमोरच अजितदादांच्या नावाची घोषणाबाजी

मुंबई : महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रम पार पडत आहे. या कार्यक्रमाला राज्यातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली असून यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षेनेते अजित पवार यांच्यासह शिंदे-फडणवीस सरकारमधील काही आमदार उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान, अजित पवार यांच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या. अजित पवारांच्या नावाने घोषणा देण्यात आल्याने ही […]

Untitled Design (19)

Untitled Design (19)

मुंबई : महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रम पार पडत आहे. या कार्यक्रमाला राज्यातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली असून यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षेनेते अजित पवार यांच्यासह शिंदे-फडणवीस सरकारमधील काही आमदार उपस्थित होते.

या कार्यक्रमादरम्यान, अजित पवार यांच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या. अजित पवारांच्या नावाने घोषणा देण्यात आल्याने ही दृश्य पाहुन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह अजित पवारही चकीत झाले आहेत. कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यावेळी बाजूलाच बसलेले होते. यावेळी सर्वपक्षीय नेते कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसमोर एकच वादा…अजित दादा, अजित पवारांचा विजय असो अशा घोषणा दिल्याने कार्यक्रमास्थळी असलेल्या नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. विशेष म्हणजे कार्यक्रमात सर्वपक्षीय नेते उपस्थित असताना अजित पवारांच्या समर्थनात घोषणा देण्यात आल्याने एकच चर्चा रंगली.

पुण्यातील बालेवाडी परिसरात महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेला सुरुवात झालीय. या स्पर्धेत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, खेळाडू आणि क्रीडाप्रेमींनी लाभ घ्यावा आणि खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन क्रीडा व युवक सेवा आयुक्त सुहास दिवसे यांच्याकडून करण्यात आले होते. त्या अनुषंगाने स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात स्पर्धक दाखल झाले आहेत.

दरम्यान, एकीकडे कार्यक्रम सुरु आणि अचानक घोषणा सुरु झाल्याने हे सर्व पाहुन मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री आणि अजित पवारही चकीत झाले होते.

Exit mobile version