इसिसच्या कारवायांमध्ये मदत करणाऱ्या 7 जणांविरुध्द आरोपपत्र, NIA ची मोठी कारवाई

मुंबई : NIA ने दहशतवादाविरोधातील लढाईत एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. देशाच्या विविध भागात दहशतवादी हल्ले (Terrorist attacks) घडवून आणण्याच्या कटात सहभागी असलेल्या 7 इसिस सदस्यांविरुद्ध राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) आरोपपत्र दाखल केले. पुण्यातील इसिस टेरर मोड्यूल (ISIS Terror Module) प्रकरणात यूएपीए कायद्यासह अनेक कलमांखाली मुंबईच्या एनआयए न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. Gram Panchayat […]

इसिसच्या कारवायांमध्ये मदत करणाऱ्या 7 जणांविरुध्द आरोपपत्र, NIA ची मोठी कारवाई

(ISIS Terror Module

मुंबई : NIA ने दहशतवादाविरोधातील लढाईत एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. देशाच्या विविध भागात दहशतवादी हल्ले (Terrorist attacks) घडवून आणण्याच्या कटात सहभागी असलेल्या 7 इसिस सदस्यांविरुद्ध राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) आरोपपत्र दाखल केले. पुण्यातील इसिस टेरर मोड्यूल (ISIS Terror Module) प्रकरणात यूएपीए कायद्यासह अनेक कलमांखाली मुंबईच्या एनआयए न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

Gram Panchayat Election : राज्यातील 2,369 ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात, कोण मारणार बाजी? 

मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान, मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी, कादिर दस्तगीर पठाण, सीमाब नसीरुद्दीन काझी, झुल्फिकार अली बडोदावाला, शमिल साकिब नाचन आणि अकीफ अतिक नाचन अशी आरोपींची नावे आहेत.

दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद आणि हिंसाचाराशी संबंधित कारवाया आणखी वाढवण्याच्या उद्देशाने हे आरोपी दहशतवादी संघटनेसाठी निधी उभारण्यात आणि गोळा करण्यात गुंतले होते, असं तपास यंत्रणेनं सांगितलं. त्यांच्यावर वाँटेड दहशतवाद्यांना आश्रय देत देणं, इम्प्रोव्हाइज्ड स्फोटक बनवणं, हिंसक कारवाया घडवण्यासाठी निधा गोळा करणं, असे आरोप आहेत. तसेच त्यांच्याकडू मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

दहशतवादी हल्ला करण्यासाठी आरोपींनी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तेलंगणासह अनेक राज्यांमध्ये रेकी केली होती. रेकी दरम्यान त्यांनी देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करण्यासाठी नेमके कुठं स्फोट घडवता येतील, याची चाचपणी केली होती. त्यांच्या कारवायांमुळे अनेक विध्वंसक कृत्ये होण्याची शक्यता होती.

दरम्यान, या आरोपींवर विविध कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा, स्फोटक पदार्थ कायदा, शस्त्र कायदा आणि भारतीय दंड संहिता यासारख्या विविध कायद्यांतर्गत हे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींनी भारताची सुरक्षा, अखंडता आणि सार्वभौमत्व धोक्यात आणण्याच्या उद्देशाने इसिसच्या दहशतवादी कारवाया वाढवण्याचा कट रचला होता. त्यांच्या अटकेमुळे ISIS चे मोठे नेटवर्क उद्ध्वस्त झाले.

Exit mobile version