Download App

CM शिंदेंचा साधेपणा! मिसळीचा घेतला सहकाऱ्यांसोबत आस्वाद; स्वत: भरलं बिल, कामगारांना दिलं दिवाळी गिफ्ट

  • Written By: Last Updated:

Eknath Shinde : कुठलाही राजकीय वारसा नसतांना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आज राज्याच्या प्रमुखपदी पोहोचले. रिक्षा चालक ते मुख्यमंत्री हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. मुख्यमंत्री झाल्यावरही त्यांना आपला साधेपणा कायम ठेवला. आजही त्यांची मातीशी, शेतीशी नाळ घट्ट आहे. त्यांच्या साधेपणाचा कायम राज्यातील नागरिकांना प्रत्यय येतो. ते आपल्या कॉमनमॅन इमेजसाठी ओळखले जातात. आजही ठाणेकरांना त्याच्या दिलदारपणाची आणि साधेपणाची प्रचिती आली. आज आपल्या काही सहकाऱ्यांसोबत ठाण्यातील मिसळ खाण्याचा आनंद लुटला.

World Cup 2023 : सेमीफायनलसाठी दोन नवीन नियम; सामना रद्द झालाी तरी निकाल लागणार 

दिवाळीनिमित्त आज ठाण्यात अनेक ठिकाणी दिवाळी पहाट आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांनी सकाळपासूनच या कार्यक्रमांना भेटी देऊन ठाणेकरांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी ठाण्यातील प्रसिद्ध आशा मामलेदार मिसळ खाण्याचा आनंद लुटला. त्यांच्यासोबत आमदार प्रताप सरनाईक, रवींद फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के आणि शिवसेनेचे पदाधिकारी होते. या सर्वांनी मिसळवर ताव मारला.

‘आत एक आणि बाहेर एक असं अजितदादा कधीच…’; उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुश्रीफांचं प्रत्युत्तर

मिसळीचा आस्वाद घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः बिल दिलं. आणि तेथील कामगारांना दिवाळी भेटही दिली. मुख्यमंत्र्यांच्या या दिलदारपणामुळं शिवसेना कार्यकर्ते आणि ठाणेकर नागरिक भारावून गेले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांचा जयजयकार केला. मुख्यमंत्री शिंदे यांचे सहकाऱ्यांसोबत मिसळ खातांनाचे फोटो चांगलेच व्हायलर झाले असून त्यावर कार्यकर्त्यांच्या कमेंटचा पाऊस पडत आहे.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आज ठाण्यात सर्व तरुणाईचा जल्लोष दिसतो, आपल्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. राज्यातील सर्व अरिष्ट दूर व्होवो. ही दिवाळी सुख समृध्दीची जावो असं म्हणत शुभेच्छा दिल्या. ठाणेकरांचा जल्लोष ओसंडून वाहतोय. गेल्यावर्षी पण जोर होता. त्यापूर्वी बंद होतं. आपलं सरकार आल्यापासून सगळी बंधन काढली. आपले सण उत्सव ही परंपरा वाढवायला हवी. ते काम तरुणाई करते, अशा शब्दात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या तरुणाईचं कौतुक केलं.

राजकारणी लोकांनी सामान्यांची दिवाळी खराब करू नाही. राजकारण करायला खुप संधी असते. दिवाळीचा सण सामान्याच्या आयुष्यात सुखाचा, समृध्दीचा असतो. त्या आनंदारवर विरजण घालू नये, असं सल्लाही त्यांनी राज्यातील जनतेला दिला.

काल फुसका बार आला, पण वाजलाच नाही. आमच्या कार्यकर्त्यांच्या फटाक्यांचा आवाज एवढा होता की, त्यांना युटर्न घ्यावा लागला. माज उतरवण्याची भाषा करणाऱ्यांना ग्राम पंचायतमध्ये जनतेने जागा दाखवली. आज त्यांना सातव्या क्रमांकावर पाठवलं. उद्या त्यांचा दहावा नंबरही लागू शकतो. त्यामुळं मला त्यावर जास्त काही बोलायचं नाही. आरोपांना मी कामातून उत्तर देईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

Tags

follow us