Download App

Crane Accident on Samriddhi : 304 अन्वये गुन्हा दाखल, दोषींवर कारवाई करणारच; मुख्यमंत्र्यांची घोषणा

  • Written By: Last Updated:

Crane Accident on Samriddhi Highway : समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे मध्यरात्री क्रेन पडून झालेल्या अपघातात २० मजुरांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये तीन जण जखमी झाले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी मृत कामगारांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली असून दोषींवर कारवाई केली जाईल, असे सांगितले. (CM Eknath Shinde on Crane Accident at Samriddhi Highway 304crime registered action will be taken against the culprits)

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील सरलांभबे गावाजवळ पुलाचे बांधकाम सुरू असताना गर्डर मशीन कोसळल्याची घटना घडली आहे. समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी हा पूल बांधण्यात येत असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहापूर येथील समृद्धी महामार्गावरील दुर्घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी माध्यमांशी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले, शहापूर येथे झालेल्या अपघातात आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3 जण जखमी झाले आहेत. उड्डाणपुलाचे काम सुरू असताना गर्डर पडल्याने मोठा अपघात झाला. ही घटना दुर्दैवी आहे. आम्ही सर्व गोष्टींची पाहणी केली आहे. हे काम तांत्रिकदृष्ट्या खूप अवघड आहे. लाँचर आणि गार्डर खाली पडल्याने हा अपघात झाला. या घटनेची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

कार्यक्रमात अजित पवार शरद पवारांच्या मागून का गेले? दादांनी सांगून टाकलं 

ते म्हणाले, यात 700 टन लाँचर आणि 12.5 टन गर्डर आहे. ते खाली पडल्याने मोठा अपघात झाला.याप्रकरणी 304अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे काम करणारी कंपनी स्वित्झर्लंडची आहे. त्याचे तांत्रिक केंद्र सिंगापूर आणि चेन्नई येथे आहे. त्यांची तांत्रिक टीमही येथे येणार असून ते ही घटना कशामुळे घडली, याची चौकशी करेल, असं शिंदे यांनी सांगितलं.

एकनाथ शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेची दखल घेतली आहे. त्यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारकडून 2 लाख रुपयांची मदतही देण्यात आली आहे. राज्य सरकारने 5 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. तर कंपनीने देखील 5 लाख देण्याचेही ठरवल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

Tags

follow us

वेब स्टोरीज